शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

डाळीची साठेबाजी सुरूच

By admin | Updated: July 15, 2016 02:57 IST

बाजारात तूर व चणा डाळीच्या वाढत्या भाववाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पुरवठा

२०६ क्विंटल तूर, ८५० क्विंटल चणा साठा जप्त नागपूर : बाजारात तूर व चणा डाळीच्या वाढत्या भाववाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पुरवठा विभागाने गुरुवारी वडोदा येथील शुभम लॉजिस्टीक वेअर हाऊसच्या गोदामावर धाड टाकली. या धाडीमध्ये २०६ क्विंटल तुरीचा साठा व ८५० क्विंटल चणा जप्त करण्यात आला आहे. वडोदा येथे शुभम लॉजिस्टीक वेअर हाऊस या नावाने अन्नधान्य साठवणुकीसाठीचे गोदाम असून त्या ठिकाणी मे. करण टेड्रींग कंपनीचे प्रोपा. राकेश ओमप्रकाश अग्रवाल यांनी ४५० क्विंटल चणा तसेच मे. कल्पना ट्रेडींग कंपनीचे प्रोपा. लक्ष्मीकांत मेघराज तेलमासरे यांनी ४०० क्विंटल चणा साठवणूक करुन ठेवल्याचे आढळून आले. याबाबत आवश्यक असलेला रेकार्ड जसे साठा रजिस्टर, बिल बुक, विक्री रजिस्टर, सी फार्म तपासणीच्या वेळी सादर न केल्यामुळे हा साठा जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने जप्त केला. तसेच मे. वासुदेव अ‍ॅग्रो यांनी २०६ क्विंटल तुरीचा साठा या गोदामामध्ये विनापरवाना ठेवल्याने हा साठादेखील जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने जप्त केला. जप्त साठ्याची अंदाजे किंमत ८७०० रुपये प्रती क्विंटल तूर याप्रमाणे व चणा अंदाजे किंमत ८ हजार रुपये प्रती क्विंटल याप्रमाणे एकूण ८५ लाख ९२ हजार २०० रुपये इतकी आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी एन.आर. वंजारी, निरीक्षक अधिकारी पी.एल.कुबडे, पुरवठा निरीक्षक प्रशांत शेंडे यांनी केली. (प्रतिनिधी)