शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कागदोपत्री कारवाईत अडले कासव!

By admin | Updated: June 14, 2015 03:06 IST

मागील १२ दिवसांपूर्वी रेल्वे पोलिसांनी तस्करांकडून पकडलेले कासव केवळ कागदपत्रांच्या कारवाईत अडकून पडले आहेत.

१६ कासवांचा मृत्यू : पीसीसीएफच्या परवानगीची प्रतीक्षा नागपूर : मागील १२ दिवसांपूर्वी रेल्वे पोलिसांनी तस्करांकडून पकडलेले कासव केवळ कागदपत्रांच्या कारवाईत अडकून पडले आहेत. नागपूर वन विभागाने ते सर्व कासव लखनौ येथे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यासाठी उत्तर प्रदेशचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांची परवानगी लागत असून, त्यासाठी मागील आठ दिवसांपासून प्रतीक्षा केली जात आहे. दुसरीकडे मागील १२ दिवसांत १६ कासवांचा मृत्यू झाला असून, आता ८० कासव शिल्लक राहिले आहेत. नागपूर वन विभागाने उर्वरित सर्व कासम सेमिनरी हिल्स येथील मृगविहारातील पाण्याच्या टाक्यात ठेवले आहेत. यासंबंधी नागपूरचे उपवनसंरक्षक के. आर. प्रवीण यांना विचारणा केली असता, त्यांनी वन विभागाने कासवांना लखनौ येथे पाठविण्याची सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे सांगितले. परंतु त्यासाठी उत्तर प्रदेशचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांची परवानगी लागत असून, त्यासाठी प्रतीक्षा केली जात आहे. कासवांच्या मृत्यूविषयी बोलताना ते म्हणाले, तस्करांनी या कासवांना डब्यात पॅकबंद केल्यामुळे काही कासवांचा गुद्मरून मृत्यू झाला आहे. परंतु आता उर्वरित कासव सुरक्षित असल्याचे ते म्हणाले. मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांच्या मते, कासवांना लखनौ येथे पाठविण्यासाठी तेथील एका स्वयंसेवी संस्थेसह उत्तर प्रदेशच्या पीसीसीएफ कार्यालयाशी सतत संपर्क साधला जात आहे. शिवाय मागील ४ जून रोजी एक लेखी पत्रही पाठविण्यात आले आहे. परंतु अजूनपर्यंत त्या पत्राचे उत्तर आलेले नाही. विशेष म्हणजे, या कासवांना लखनौ येथे पाठविण्यासाठी महाराष्ट्राचे पीसीसीएफ व न्यायालयाने यापूर्वीच परवानगी दिली असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)