शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

डीए वाढीला ग्रहण

By admin | Updated: May 14, 2014 01:28 IST

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए) मिळण्याची शक्यता मावळल्यात जमा आहे. आर्थिक संकटाचे कारण समोर करीत महापालिका प्रशासनाने सध्याच वाढीव डीए लागू केला जाणार नाही,

नागपूर : महापालिकेच्या कर्मचार्‍यांना महागाई भत्ता (डीए) मिळण्याची शक्यता मावळल्यात जमा आहे. आर्थिक संकटाचे कारण समोर करीत महापालिका प्रशासनाने सध्याच वाढीव डीए लागू केला जाणार नाही, असे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे डीए वाढीच्या संदर्भातील जीआर दोन दिवसांपूर्वीच महापालिकेला प्राप्त झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयुक्त श्याम वर्धने यांच्याशी लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे यांनी चर्चा केली. आयुक्तांनी विविध विभागांकडून होत असलेल्या उत्पन्नाचा आढावा घेतला. यानंतर डीएत वाढ करणे शक्य नाही, असा निर्णय घेण्यात आला. काही महिन्यांपूर्वीच महापालिका कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये १0 टक्के वाढ करण्यात आली होती.

महापालिकेता सुमारे १२ हजार कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. यात चार हजार ऐवजदार आहेत. ऐवजदार वगळता अन्य कर्मचारी व अधिकार्‍यांना डीए लागू होतो. डीएत वाढ केली तर तिजोरीवर आणखी बोझा वाढतो.

सध्या महापालिकेचे उत्पन्न बघता कर्मचार्‍यांचे पगार देणे कठीण जात आहे. अशा परिस्थितीत डीए देणे शक्य दिसत नाही. काही महिन्यांपूर्वीपर्यंंत महापालिकेतील कर्मचार्‍यांना महिन्याच्या १0 तारखेला पगार मिळायचा. मात्र, सध्या २0 तारखेपर्यंंंत पगार दिला जात आहे. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये नाराजी आहे. महापालिकेच्या कर्मचार्‍यांना एप्रिल महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही, अशी माहिती आहे.

एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू झाल्यानंर राज्यातील महापालिकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. अमरावती महापालिकेच्या कर्मचार्‍यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. तेथील कर्मचार्‍यांनी महापौरांना पत्र लिहून लेखा व वित्त अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी मागितली आहे. दुसरीकडे नागपूर महापालिकेत कर्मचार्‍यांना पगार उशिरा मिळत आहे, मात्र पगार अडलेले नाहीत.

महापालिकेचे लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे यांनी सांगितले की, सद्यस्थितीत डीएमध्ये वाढ करणे शक्य नाही. मार्चच्या शेवटी वसुली ५0 टक्क्यांपेक्षा कमी झाली. यासाठी पगाराच्या पॅटर्नमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे. २0 तारखेपर्यंंत पगार दिला जात आहे. विभागांकडून पगाराची बिले उशिरा मिळत असल्यामुळे कर्मचार्‍यांचा पगार वेळेत करण्यात अडचणी जात आहेत, असेही गाडगे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)