शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

एपिलेप्सीच्या जनजागृतीसाठी सायकलथॉन

By admin | Published: November 24, 2014 1:18 AM

नागपूर एपिलेप्सी असोसिएशनच्या वतीने रविवारी सकाळी ‘सायकलथॉन’चे आयोजन करून ‘अपस्मार’ या आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस

नागपूर : नागपूर एपिलेप्सी असोसिएशनच्या वतीने रविवारी सकाळी ‘सायकलथॉन’चे आयोजन करून ‘अपस्मार’ या आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. यावेळी प्रसिद्ध न्यूरोलॉजी तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. पौर्णिमा करंदीकर, माजी महापौर माया इवनाते, नागपूर एपिलेप्सी असोसिएशनच्या अध्यक्षा संध्या दुर्गे, उपाध्यक्ष डॉ. संजय रामटेके, सचिव शोभा सरोदे व नंदिनी बाळ आदी मान्यवर उपस्थित होते.‘राष्ट्रीय अपस्मार दिना’च्या निमित्ताने असोसिएशनच्या वतीने १७ ते २३ नोव्हेंबर या सप्ताहात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. एपिलेप्सी (मिरगी) या आजारावर विविध शाळा-कॉलेजमधून पोस्टर्स, पॉवर पॉर्इंट प्रेझेन्टेशन व शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. मिरगी म्हणजे काय, त्याची लक्षणे, मिरगीचा दौरा पडल्यास काय करायला हवे, काय करू नये, या आजाराशी संबंधित अंधश्रद्धा व औषधोपचार आदींवर मार्गदर्शन करण्यात आले. आज सायकल रॅली काढून या सप्ताहाचा समारोप झाला. यावेळी ५०० वर विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथून रॅलीला सुरुवात झाली. काचीपुरा, रामदासपेठ चौक, बजाजनगर चौक, व्हीएनआयटी गेट चौक, श्रद्धानंदपेठ चौक, लक्ष्मीनगर चौक, चित्रकला महाविद्यालय चौक असे करीत डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रॅलीचे समापन झाले. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना टी-शर्ट, कॅप व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. जास्तीतजास्त लोकांपर्यंत या आजाराची माहिती पोहोचविण्याची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नागपूर एपिलेप्सी असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांंनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)