शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
2
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
3
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
4
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
5
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
6
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
7
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
10
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
12
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
13
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
14
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
15
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
16
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
17
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
18
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
19
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
20
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
Daily Top 2Weekly Top 5

चालू तिकीट कार्यालय चोरट्यांचा अड्डा

By admin | Updated: June 6, 2015 02:08 IST

रेल्वेगाडी येण्यास वेळ असल्यामुळे बहुतांश प्रवासी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात लोहमार्ग पोलीस

नागपूर : रेल्वेगाडी येण्यास वेळ असल्यामुळे बहुतांश प्रवासी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात लोहमार्ग पोलीस ठाण्यासमोरील चालू तिकीट कार्यालयाच्या मोठ्या हॉलमध्ये आराम करतात. याचा फायदा घेऊन तेथे चोरट्यांचा उपद्रव वाढला असून प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तेथे पोलिसांची ड्युटी लावण्याची मागणी होत आहे.शुक्रवारी अजित मिश्रा (५०) रा. पुणे हे आपल्या वैयक्तिक कामानिमित्त जयपूरला जात होते. गाडी येण्यासाठी थोडा उशीर असल्यामुळे ते चालू तिकीट कार्यालयाच्या हॉलमध्ये आराम करीत होते. त्यांनी आपली बॅग बाजूलाच ठेवली होती. तेवढ्यात एक भिकारी त्यांना पैसे मागण्यासाठी त्यांच्याजवळ आला. त्याला पैसे देत असताना दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग घेऊन पळ काढला. त्यांच्या बॅगमध्ये चार हजार रुपये रोख, कपडे होते. बॅग चोरीला गेल्यामुळे आणि त्यात पैसे असल्यामुळे हा प्रवासी चिंतातूर होऊन इकडेतिकडे फिरत होता. चालू तिकीट कार्यालयाच्या परिसरात असामाजिक तत्त्वांचा उपद्रव वाढला आहे. प्रवाशांचे महागडे साहित्य, मोबाईल, पाकिट चोरीला जाण्याच्या घटना येथे नेहमीच घडतात. परंतु त्यापासून लोहमार्ग पोलिसांनी कोणताच धडा घेतलेला दिसत नाही. (प्रतिनिधी)