शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

प्रकृतीमध्ये विकृती निर्माण झाली की संस्कृतीचा ऱ्हास होतो

By admin | Updated: January 13, 2015 01:03 IST

प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाणे याला विकास म्हणतात. आज चंगळवाद व सुधारणेच्या नावाखाली प्रकृतीमध्ये विकृती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रकृतीचा ऱ्हास होत आहे. यासाठी नीतीचे बंध घालणे

भरतबुवा रामदासी : नीतीचे बंध घालणे आवश्यकनागपूर : प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाणे याला विकास म्हणतात. आज चंगळवाद व सुधारणेच्या नावाखाली प्रकृतीमध्ये विकृती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रकृतीचा ऱ्हास होत आहे. यासाठी नीतीचे बंध घालणे आवश्यक असल्याचे विचार ह.भ.प. भरतबुवा रामदासी महाराज यांनी केले. कीर्तन महोत्सव आयोजन समिती व राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने चिटणीस पार्कवर सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवाचे चौथे पुष्प त्यांनी गुंफले. त्यांचा कीर्तनाचा विषय देव, देश आणि धर्मावर नितांत प्रेम करणाऱ्या राजे संभाजी महाराज हा होता. आपल्या कीर्तनात त्यांनी विकृती आणि संस्कृतीतील तुलना केली. विकृती जीवन बिघडविते तर संस्कृती जीवन घडविते. विकृती देवाला दगड तर संस्कृती दगडाला देव बनविते. आज सुधारणेच्या नावाखाली संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. प्रगती ही जगण्याला आवश्यक आहे. पण ती नैतिक मूल्याच्या अधिष्ठानावर असायला पाहिजे. जगाकडे बघितल्यानंतर लक्षात येते की, हे संपूर्ण जग अपूर्णतेने ग्रासलेले, विसंगतीने माखलेले, संघर्षानी फाटलेले, दुभंगलेले, विनाशाने ओढवलेले आहे. मानवी जीवनाची उत्क्रांती करायची असेल तर धर्माची नितांत गरज आहे. धर्माचे चिंतन मांडताना भरतबुवा म्हणाले, धर्म ही जीवनपद्धती आहे. प्रत्येक धर्मात तत्त्वमीमांसा, आचारसंहिता असते. हे सर्व विसरून आंधळी कवायत करण्याकडे माणसाचा कल दिसून येत आहे. संभाजी राजांनी देश, देव व धर्मावर नितांत प्रेम केले. त्यासाठी बलिदान दिले. धर्माने कधीही द्वेष, मत्सर शिकविला नाही. धर्म सांगतो आपापले कर्म परमेश्वराला आवडेल असे करा. आज कीर्तन महोत्सवाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्वामी छोटे बालकदास महाराज, आ. मिलिंद माने, उद्योजक विलास काळे उपस्थित होते. आजची आरती रवींद्र भोयर व मदन अडकिने यांच्याहस्ते झाली. (प्रतिनिधी)