शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोरिजन निवडणुकीत क्रॉस व्होटिंग

By admin | Updated: May 18, 2015 02:43 IST

महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) एकूण २८ जागांसाठी रविवारी झालेल्या मतदानात मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाल्याची माहिती आहे ..

नागपूर : महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) एकूण २८ जागांसाठी रविवारी झालेल्या मतदानात मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाल्याची माहिती आहे त्यामुळे धक्कादायक निकाल पुढे येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत ९९ टक्के मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. १९ तारखेला सीताबर्डीतील सांस्कृतिक भवनात सकाळी ८ वा. पासून मतमोजणीला सुरुवात होईल.मेट्रोरिजनच्या २८ जागांसाठी रविवारी सकाळी ८ वा. पासून मतदानाला सुरुवात झाली. नागपूर शहरातील २० जागांसाठी २५ उमेदवार व १४५ मतदार होते. त्यापैकी १४४ मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. एका नगरसेवकांने मतदान केले नाही. त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील ८ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात होते. एकूण ३३० मतदारांपैकी ३२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.शहरात नगरसेवक मतदार होते. काँग्रेस,भाजप, बसपा आणि शिवसेना यांना त्यांच्या मतांचा कोटा ठरवून देण्यात आला होता. मात्र त्यानुसार मतदान झाले नसल्याची माहिती सूत्रांची दिली. घातपाताचा फटका भाजपचा मित्र पक्ष शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. असाच प्रकार ग्रामीण भागातही घडला असून यामुळे येणारे निकाल धक्का देणारे ठरू शकतात. मतदारांची संख्या कमी असल्याने दुपारपर्यंतच मतदान केंद्रावर धावपळ होती. एका नगरसेवकाने दोन वेळा मतपत्रिकेची मागणी केली. त्यामुळे त्याचे मत अवैध ठरण्याची शक्यता आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली. मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त चोख होता. (प्रतिनिधी)