शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याची मुदत संपली, नुकसानीची जबाबदारी घेणार कोण? ३ जून अंतिम तारीख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 14:33 IST

Nagpur : नवीन निविदा मंजुरीला महिनाभराचा वेळ

सुनील चरपे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सन २०२४-२५ चा रब्बी हंगाम संपताच राज्यातील पीक विम्याची मुदत संपली. २०२५-२६ च्या खरीप व रब्बी हंगामासाठी कंपन्यांकडून ३ जूनपर्यंत नवीन निविदा मागवल्या आहेत. या निविदा मंजुरी ते शासन निर्णय यासाठी किमान महिनाभराचा काळ लागणार आहे. या काळात पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी विमा परतावा व भरपाईपासून वंचित राहणार आहेत.

पावसाला सुरुवात झाल्याने राज्यात १२ ते १५ जूनपासून खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात होईल. सध्या कंपन्यांकडून जिल्हानिहाय पीकविम्याच्या निविदा सादर करणे सुरू आहेत. ३ जूननंतर या निविदा उघडून त्यावर निर्णय घेतला जाईल. मंजूर निविदांचा तुलनात्मक विचार करून त्याचे रूपांतर शासन निर्णयात केले जाईल. त्यानंतर शेतकरी हप्ते भरून पिकांचा विमा काढतील. या संपूर्ण प्रक्रियेला किमान महिनाभराचा काळ लागतो.

या काळात पिकांचे नुकसान झाल्यास ते विमा संरक्षित नसेल. ज्या दिवशी शेतकरी हप्ते भरतील, त्या दिवसापासून त्यांच्या पिकांना विमा संरक्षण दिले जाईल. आधीच्या नुकसानीची जबाबदारी विमा कंपन्या स्वीकारणार नाही. सरकार देखील त्यांना सक्ती करणार नाही. विशेष म्हणजे, या निविदा प्रक्रियेला मुद्दाम विलंब करण्यात आला आहे.

विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर यात तफावतपीक विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता दर व विमा हप्ता या महत्त्वाच्या बाबी विमा कंपन्या ठरवितात. यात सरकार हस्तक्षेप करत नाही. सीमालगतच्या जिल्ह्यात या तिन्ही बाबींमध्ये मोठी तफावत आहे. सोयाबीनसाठी अकोला जिल्ह्यात पीक विमा संरक्षित रक्कम ५४ हजार रुपये प्रतिहेक्टर, विमा हप्ता दर २२ टक्के व विमा हप्ता ११,८८० रुपये प्रतिहेक्टर आहे. लगतच्या बुलढाण्यात हा दर अनुक्रमे ५५,५०० रुपये, ८ टक्के व ४,४४० रुपये, वाशिममध्ये ५४ हजार रुपये, ८ टक्के व ४,३२० रुपये तसेच अमरावती जिल्ह्यात ५३ हजार रुपये, १६.५ टक्के व ८,४७५ रुपये प्रतिहेक्टर ठरविले आहे.

"पीकविमा पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे. त्याऐवजी हा विमा हवामान आधारित असावा. कृषी व विमा कंपन्यांचे अधिकारी पीक कापणी प्रयोग करीत नाही. सरकारने प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वयंचलित हवामान केंद्र उभारावे. पीक कापणी प्रयोग दिशाभूल करणारा आहे."- मिलिंद दामले, अध्यक्ष, शेतकरी संघटना तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडी, महाराष्ट्र 

टॅग्स :nagpurनागपूरCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी