शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीचे ’काऊंटडाऊन’ यंत्रणा सज्ज

By admin | Updated: May 11, 2014 01:33 IST

पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण होत आली आहे. मतदानस्थळी ‘डाटा एन्ट्री’चे काम अचूक व्हावे,

‘डाटा एन्ट्री’चा सराव

नागपूर : पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण होत आली आहे. मतदानस्थळी ‘डाटा एन्ट्री’चे काम अचूक व्हावे, यासाठी निवडणूक शाखेत सरावासाठी यंत्रणाही उभी करण्यात आली आहे. मतमोजणीशी संबंधित प्रत्येक आकडेवारी अचूक नोंदविल्या जावी, यावर आयोगाचा भर आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत. मतमोजणीस्थळी ‘डाटा एन्ट्री’ची व्यवस्था केली जाते. आकडेवारी अचूक आणि आयोगाने ठरवून दिलेल्या प्रपत्रानुसार नोंदविली जावी, यासाठी गेल्या तीन दिवसांपासून या कामाचा सराव निवडणूक शाखेत सुरू आहे. १२ डाटा एन्ट्री आॅपरेटरची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानस्थळी डाटा एन्ट्रीची जी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, त्याची रंगीत तालीम निवडणूक शाखेत सुरू आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विशेष सॉफ्टवेअर (इलेक्शन मॅनेजमेंट सॉफ्टवेअर) तयार करण्यात आले आहे. नोंदविण्यात आलेली आकडेवारी अचूक आहे किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी त्याची पडताळणीही केली जाणार आहे. दरम्यान, मतमोजणीसाठी सरासरी १५०० कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना येत्या १२ आणि १५ तारखेला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १६ मे रोजी सकाळी ८ वाजता कळमना मार्केट यार्डमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. नागपूर आणि रामटेकमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीची व्यवस्था आहे. प्रथम टपाल मतपत्रिकांची मोजणी केली जाईल. यंदा टपाल मतमोजणीसाठी आयोगाने विशेष निर्देश दिले आहेत. त्यानुसार ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. अधिकार्‍यांना त्यांचे भ्रमणध्वनी सोबत ठेवता येणार आहेत. (प्रतिनिधी) .