शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वेसाठी इमारती पाडणार

By admin | Updated: February 21, 2016 02:37 IST

शासकीय जमिनीनंतर आता मेट्रो रेल्वेसाठी खासगी जमिनी ताब्यात घेण्यात येणार असून बांधकामात अडथळा ठरणाऱ्या इमारती पाडण्यात येणार आहे.

खासगी जमीनधारकांना नोटिसा : २२ पासून सुनावणीनागपूर : शासकीय जमिनीनंतर आता मेट्रो रेल्वेसाठी खासगी जमिनी ताब्यात घेण्यात येणार असून बांधकामात अडथळा ठरणाऱ्या इमारती पाडण्यात येणार आहे. ५.३ हेक्टर जमिनीसाठी १७६ जमीनमालकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. जमीन ताब्यात घेण्यासाठी २२ फेब्रुवारीपासून सुनावणी होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.एकूण ९८.५१ हेक्टर जमिनीचे अधिग्रहणशहरात पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण भागात उभारण्यात येणाऱ्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी एकूण ९८.५१ हेक्टर जमिनीची गरज आहे. त्यापैकी ७७ टक्के अर्थात ८७.४ हेक्टर जमीन कंपनीला शासनाने दिली आहे. खासगी जमीन ताब्यात घेण्यासाठी मेट्रो रेल्वेपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सुनावणीनंतर मालकाने जमीन न दिल्यास बळजबरीने हिसकावणार का, असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे. १७६ जमीनमालकांना नोटीसानोटीसा दिलेल्या १७६ जमीनमालकांना दिलेल्या तारखेनुसार सुनावणीला हजर राहायचे आहे. ही सुनावणी २२, २३, २६, २९ फेब्रुवारी आणि २ मार्चला होणार आहे. पूर्व-पश्चिम सीए रोडवर कल्पना टाईल्स, आंबेडकर चौक येथील असीम पेन्ट्स, हिंदुस्थान इंजिनिअरिंग, नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी, अमरजित सिंग इंजिनिअरिंग, अंबाझरी कॉर्नर येथील शेनॉय बिल्डिंग तर उत्तर-दक्षिण मार्गावर २० जमीनमालकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. अशी धावणार रेल्वेपूर्व-पश्चिम मार्गावर प्रजापतीनगर, वैष्णवदेवी चौक, आंबेडकर चौक, टेलिफोन एक्स्चेंज, चिताळओळी चौक, अग्रसेन चौक, दोसर चौक, नागपूर रेल्वे स्टेशन, सीताबर्डी, सीताबर्डी, शंकरनगर चौक, एलएडी चौक, धरमपेठ कॉलेज, सुभाषनगर, वासुदेवनगर, बन्सीनगर, लोकमान्यनगर अशी मेट्रो धावणार आहे. तर उत्तर-दक्षिण मार्गावर आॅटोमोटिव्ह चौकातून निघारी मेट्रो नारी रोड, इंदोरा चौक, कडबी चौक, गड्डीगोदाम चौक, कस्तुरचंद पार्क, झिरो माईल्स, सीताबर्डी, काँग्रेसनगर, रहाटे कॉलनी, अजनी चौक, छत्रपती चौक, जयप्रकाशनगर, उज्ज्वलनगर, एअरपोर्टमार्गे मिहानपर्यंत जाणार आहे. मोबदल्याचा पत्ताच नाहीनागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोेरेशन लिमिटेडच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त हॉटेल रॅडिसनमध्ये आयोजित एका संवादात्मक कार्यक्रमात शेतजमीन बळजबरीने घेतल्याच्या एका शेतकऱ्याच्या प्रश्नावर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी सकारात्मक भाष्य केले नाही. प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या २०१३ च्या जमीन कायद्यानुसार आणि २०१५ च्या राज्याच्या अध्यादेशानुसार जमिनीचे हस्तांतरण करण्यात असल्याचे सांगितले. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्यांच्या जमीन घेण्यात येणार आहे, त्यांना पर्यायी जागा, पैसा, टीडीआर देणार काय, यावरही दीक्षित यांनी चुप्पी साधली होती. याप्रश्नी कंपनीचे अधिकारही बोलण्यास तयार नाहीत. जिल्हाधिकारी न्याय देतील, असा आम्हाला विश्वास असल्याचे मत नाव न सांगण्याच्या अटीवर जमीनमालकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. यासंदर्भात बृजेश दीक्षित यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)