शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोरिजनचा आराखडा संविधान विरोधी

By admin | Updated: November 29, 2015 03:30 IST

भारतीय संविधानाने जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना मूलभूत अधिकार दिले आहेत.

ब्रिगेडियर सुधीर सावंत : जय जवान जय किसानच्या आंदोलनाला समर्थननागपूर : भारतीय संविधानाने जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना मूलभूत अधिकार दिले आहेत. मात्र मेट्रोरिजन आराखड्याच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातील स्थानिक संस्थांचे अधिकार गोठविण्याचा प्रयत्न केला जात असून हा प्रकार संविधान विरोधी असल्याचा आरोप ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केला. सावंत यांनी एका पत्रपरिषदेदरम्यान जय जवान जय किसान संघटनेच्या आंदोलनाला समर्थन जाहीर केले. यावेळी संघटनेचे प्रशांत पवार उपस्थित होते.संघटनेतर्फे नासुप्रच्या मेट्रोरिजन विकास आराखड्याविरोधात रविवारी जनमत चाचणी घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी गावागावात जाऊन मेट्रोरिजन आराखड्या विरोधात प्रचार करणार असल्याचे सुधीर सावंत यांनी सांगितले. यावेळी सावंत यांनी केंद्र व राज्यातील भाजपा सरकारवर टीका करीत शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्याच्या मालाला उत्पादन खर्चाच्या ५० टक्के अधिक भाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन पाळले नाही. दुष्काळग्रस्तांना मदत मिळाली नाही. खासगीकरणाच्या सपाट्यात कामगार कायदे पायदळी तुडविले जात आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकाविल्या जात असल्याचा आरोप त्यांनी लावला. पंतप्रधान एकीकडे संविधान बदलविले जाणार नाही, अशी घोषणा करतात, मात्र दुसरीकडे देशाचे गृहमंत्री संविधानातून सेक्युलर हा शब्द वगळण्याची भाषा करतात. हा विरोधाभास न पटण्यासारखा असल्याचा टीका सुधीर सावंत यांनी केली. वन रॅँक वन पेन्शनवर सैनिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुभाष बांते उपस्थित होते.(प्रतिनिधी)