शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

आपापसात भांडणे हाच काँग्रेसचा ‘अजेंडा’

By admin | Updated: February 17, 2017 02:52 IST

कॉंग्रेस पक्षाला देशभरातून जनतेने नाकारल्यानंतरदेखील पक्षनेत्यांमध्ये वर्चस्वासाठी चढाओढ सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका : दिवाळखोर बँकेसारखी पक्षाची अवस्थानागपूर : कॉंग्रेस पक्षाला देशभरातून जनतेने नाकारल्यानंतरदेखील पक्षनेत्यांमध्ये वर्चस्वासाठी चढाओढ सुरू आहे. आपापसांत भांडण करणे हाच कॉंग्रेसचा मुख्य ‘अजेंडा’ आहे. एखाद्या दिवाळखोरीत निघालेल्या बँकेसारखी कॉंग्रेस पक्षाची अवस्था झाली आहे, या शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. एकात्मता नगर, जयताळा व सुभाषनगर येथे आयोजित प्रचारसभांमध्ये त्यांनी गुरुवारी वरील वक्तव्य केले.यावेळी मंचावर माजी खासदार दत्ता मेघे, बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे, आ. अनिल सोले प्रामुख्याने उपस्थित होते. कॉंग्रेसचे शासन असतानादेखील नेत्यांमधील भांडणाव्यतिरिक्त काहीही झाले नाही. कॉंग्रेसमधील मुत्तेमवार गट व चतुर्वेदी-राऊत गटाच्या भांडणात नागपूरचे प्रचंड नुकसान झाले. सत्ता नसतानादेखील हे नेते आपापसातीलच भांडणात व्यस्त आहे. लोकांच्या जमिनी हडप करणे हीच कॉंग्रेसची प्रवृत्ती आहे, अशी बोचरी टीका फडणवीस यांनी केली. मिहान प्रकल्पग्रस्तांना हक्काचे मालकीपट्टे देण्यासंदर्भात आम्ही प्रयत्नरत आहोत. जमिनीची मोजणी करायची होती. मात्र काही लोकांच्या पोटात दुखते आहे. जनतेसाठी काय काम केले, याचे ५ वर्षे पूर्ण झाल्यावर ‘रिपोर्टकार्ड’च सादर करू, असे ते म्हणाले.जे बोलतो ते करतो, सेनेला चिमटायावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. जगातील श्रीमंत शहरांपैकी मुंबई एक शहर आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ३७ हजार कोटींचा आहे. मात्र असे असतानादेखील तेथील १ थेंब सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. सगळे सांडपाणी समुद्रात जाते. नागपुरात नेमकी विरुद्ध स्थिती आहे, असे म्हणत त्यांनी ‘बीएमसी’च्या कार्यप्रणालीवर बोट ठेवले. मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि माझे शब्द ही काळ्या दगडावरील रेघच असते, असे सूचक वक्तव्यदेखील त्यांनी यावेळी केले. ..तर चेहरा दाखविणार नाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूरचा वेगाने विकास होत आहे. २०१९ पर्यंत नागपूरला देशातील ‘मॉडेल’ शहर बनवायचे आहे. जर असे झाले नाही तर मी चेहरादेखील दाखविणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.