शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गावागावांत चिंता, तरीही कागदावरचा दुष्काळ फक्त २८ गावांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:19 IST

नागपूर : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना ओल्या दुष्काळाचा आणि पुराचा फटका बसला आहे. गावा-गावांतील शेती यामुळे खंगली आहे. पाहणीसाठी आलेल्या ...

नागपूर : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना ओल्या दुष्काळाचा आणि पुराचा फटका बसला आहे. गावा-गावांतील शेती यामुळे खंगली आहे. पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय चमूपुढेही हे वास्तव प्रगटले होते. असे असतानाही शासनाच्या यंत्रणेने १,७८९ गावांपैकी फक्त २८ गावांतच ५० पैशांच्या आत आणेवारी काढली. त्यामुळे एकाही तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्याचे लक्षण दिसत नाही.

नापिकीची सध्या गावा-गावांत चिंता आहे. शेतकरी मदतीसाठी मोठ्या अपेक्षेने सरकारकडे पाहत आहे तरीही आकड्यांचा खेळ करून यंत्रणेने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. नागपूर जिल्ह्यात १,९५३ गावे आहेत. त्यातील खरिपाच्या १,८४४ गावांपैकी १,७८९ गावांतील आणेवारी सरकारने काढली. १४ तालुक्यांपैकी १३ तालुक्यात एकाही गावात आणेवारी ५० पैशांच्या आत नाही. फक्त मौदा आणि नागपूर (ग्रामीण) या दोन तालुक्यांतील २८ गावांतच आणेवारी ५० पैशांच्या आत दाखविली आहे.

जिल्ह्यात पीक परिस्थिती वाईट आहे. सोयाबीन, धान आणि कापूस ही मुख्य पिके सर्वच ठिकाणी वाया गेली आहेत. सोयाबिनचा पेरा नरखेड, काटोल, सावनेर, कळमेश्वर, हिंगणा, नागपूर (ग्रामीण), भीवापूर, कामठी या तालुक्यांत होता. मात्र, पावसाने सर्व पीक वाया गेले. रामटेक, मौदा, कुही, भीवापूर, कामठी, पारशीवणी या तालुक्यात धानाला मोठा फटका बसला आहे तर नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर, हिंगणा, उमरेड, भीवापूर, कुही, कामठी, पारशिवणी, नागपूर (ग्रामीण) या कापूस उत्पादक तालुक्यांतही मोठे नुकसान झाले आहे.

...

अशीही फसगत

यंत्रणेने जिल्ह्यातील १,७८९ गावांची पैसेवारी जाहीर केली. त्यात नागपूर (ग्रामीण)तालुक्यातील १४८ पैकी २५ गावात आणि मौदातील १०४ पैकी फक्त ३ गावांतच ५० पैशांच्या आत आणेवारी दाखविली. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला जाणे जवळपास शक्यच नाही. एकीकडे गावे दुष्काळात दाखवायची, मात्र मदत कशी मिळणार नाही, याचीही दक्षता घ्यायची, असा फसवणुकीचा आणि डोळ्यांत धूळ झोकणारा प्रकार यंत्रणेकडून घडला आहे.

...

तालुकानिहाय पैसेवारी

तालुका - ५० पैशांच्या आत - ५० पैशांच्या वर

नागपूर शहर - ० -०

नागपूर ग्रामीण - २५ -१२३

कामठी - ० - ७५

हिंगणा - ० - १४०

काटोल - ० - १८५

नरखेड - ० - १५५

सावनेर - ० - १३५

कळमेश्वर - ० - १०७

रामटेक - ० - १५२

पारशिवणी - ० - ११४

मौदा - ३ - १०४

उमरेड - ० - १८५

भीवापूर - ० - १२१

कुही - ० - १६२

...