शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणाविनाच अंगणवाडी सेविकांना मासिक अहवाल भरण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:20 IST

नागपूर : अंगणवाडी सेविकांना शासनाने मोबाईल दिला. अ‍ॅपच्या माध्यमातून सेविकांना दैनंदिन कामकाजाचे १० रजिस्टर भरावे लागत होते. सप्टेंबरपासून ...

नागपूर : अंगणवाडी सेविकांना शासनाने मोबाईल दिला. अ‍ॅपच्या माध्यमातून सेविकांना दैनंदिन कामकाजाचे १० रजिस्टर भरावे लागत होते. सप्टेंबरपासून हे अ‍ॅप बंद झाले आहे. त्यामुळे सेविकांच्या मोबाईलचेही काम बंद झाल्याने, सेविकांच्या कामाची जबाबदारी पर्यवेक्षिकेंवर आली; पण पर्यवेक्षिकांकडून सेविकांना मासिक अहवाल भरण्याची सक्ती करण्यात येत आहे. हे काम करताना सेविकांना भुर्दंड बसतो आहे.

विशेष म्हणजे यासंदर्भात सेविकांना कुठलेही प्रशिक्षण नाही. अहवाल न भरल्यास नोकरी सोडा असे बजावले जात असल्याचा आरोप संघटनांचा आहे. काही सेविका नोकरी वाचविण्याकरिता खासगी नेट कॅफेतून अहवाल भरतात. परंतु, त्याचा खर्च त्यांना स्वत:च्या खिशातून करावा लागतो आहे. अंगणवाडी सेविकांना १० प्रकारचे रजिस्टर भरावे लागते. यात सर्वेक्षण, वजन, लसीकरण, भरणपोषण, टीएचआर, सीबीई, किशोरवयीन मुलींचा अहवाल, आदी यासाठी महिला व बाल विकास विभागाने सेविकांना मोबाईल उपलब्ध करून दिला. ‘रॅपिड रिपोर्टिंग सिस्टीम आयसीडीसी’ या नावाने अ‍ॅप दिला होता. त्यात सेविका दर महिन्याचा ‘एमपीआर’ भरत होत्या. परंतु, सप्टेंबरपासून हे अ‍ॅप ऑपरेट होत नसल्याने, त्या अंगणवाडीचा मॅन्यूअल डाटा पर्यवेक्षिकांना उपलब्ध करून देतात. सेविकांनी दिलेला डाटा ऑनलाईन भरण्याचे काम पर्यवेक्षिकांचे आहे. परंतु, पर्यवेक्षिका त्यासाठी सेविकांनाच कामात जुंपत आहे.

अंगणवाडी सेविका संघटनांचे म्हणणे आहे की, पूर्वी दर महिन्याला एक रजिस्टर कार्यालयाकडून माहिती भरण्यासाठी यायचे. आता स्वत:च्या खिशातून रजिस्टर घ्यावे लागत आहे.

दृष्टिक्षेपात

जिल्ह्यातील अंगणवाड्या - २४२३

अंगणवाडीसेविका - २३४३

मोबाईल वाटप - २३४३

- मोबाईलवरील अ‍ॅप बंद असल्याने आम्ही अंगणवाडीचा ‘एमपीआर’ मॅन्युअली भरून पर्यवेक्षिकांना देतो. पण, पर्यवेक्षिकांकडून डाटा ऑनलाईन भरून देण्याची सक्ती करण्यात येते. हे योग्य नाही याला सेविकांचा विरोध आहे.

- ज्योती अंडरसहारे, शहरअध्यक्ष, अंगणवाडी, बालवाडी महाराष्ट्र राज्य आयटक संघटना

-

सध्या मोबाईलच्या माध्यमातून कामे बंद आहे. हा अहवाल पर्यवेक्षिकांनीच भरायचा आहे. अ‍ॅप बंद असल्याने शासन स्तरावरून फॉलोअप घेणे सुरू आहे.

- भागवत तांबे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग