शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जनता दरबारात ४०० वर तक्रारी

By admin | Updated: June 7, 2015 02:53 IST

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रविभवन येथे आयोजित जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ४०० वर तक्रारी व गाऱ्हाणी मांडण्यात आल्या.

नागपूर : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रविभवन येथे आयोजित जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ४०० वर तक्रारी व गाऱ्हाणी मांडण्यात आल्या. पालकमंत्र्यांच्या या दुसऱ्या जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी नागपूर सुधार प्रन्यासबाबत प्राप्त झाल्या. त्यानंतर मनपा, आरटीई, माहितीचे अधिकार अधिनियम, महावितरण, एसएनडीएल, भूमापन, महसूल, पोलीस विभाग आदींशी संबंधित तक्रारी होत्या. या जनता दरबारात सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अनेक वयोवृद्ध नागरिक, महिला व तरुणांनी आपल्या तक्रारी पालकमंत्री चंदशेखर बावनकुळे यांच्याकडे मांडल्या. काही अपंगंनी सुद्धा आपल्या तक्रारी मांडल्या. प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या मदतीला विशेष कार्य अधिकारी मनोहर पोटे व विशेष अधिकारी संजय धोटे हे होते. प्रशासनातर्फे उपजिल्हाधिकारी प्रकाश शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके व पोलीस अधिकारी उपस्थित होते.शनिवारी सकाळपासून नागरिकांनी रविभवन येथे तक्रार दाखल करण्यासाठी हजेरी लावली. रविभवनातील सभागृहात पालकमंत्र्यांचा जनता दरबार भरवण्यात आला होता. अधिकारी सकाळपासूनच हजर होते. परंतु सकाळी मिहान येथे कार्यक्रम असल्याने पालकमंत्र्यांचा जनता दरबार उशिरा सुरू झाला. सर्वांसाठी एकच रांग असल्याने काही वेळ गोंधळही उडाला. यावेळी अनेक व्यक्तिगत गाऱ्हाणी सुद्धा मांडण्यात आली. लहानसहान तक्रारी पालकमंत्र्यांनी जागेवरच सोडविल्या तर अनेकांना आश्वासन मिळाले. काहींच्या कामासाठी विशेष बैठक बोलावण्याचे निर्देश देण्यात आले. जवळपास ३० टक्के तक्रारी जनता दरबारातच सोडविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील शासकीय रिक्त पदे लवकरच भरणार जनता दरबार म्हणजे सर्व सामान्य गरीब जनतेला तक्रारींचे निवारण व थेट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी होय. कोणत्याही अधिकाऱ्याने तक्रारकर्त्यास अनावश्यक त्रास देऊ नये, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील रिक्त पदांची माहिती मागविली आहे. बरीच पदे रिक्त असल्यामुळे शासकीय कामाचा बोजा वाढलेला आहे. हा बोजा कमी करण्यात येईल, याकरिता आपण प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. नियोजनाचा अभाव, तक्रारकर्ते संतापले जनता दरबारासाठी तक्रारकर्त्या नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून रविभवन येथे आयोजन करण्यात आले होते. परंतु या जनता दरबारात नियोजनाचा प्रचंड अभाव दिसून आला. तक्रारकर्त्यांसाठी एकच रांग होती. त्यामुळे गर्दी प्रचंड वाढली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिक संतापले. सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांचा त्रास नागरिकांना येथेही सहन करावा लागला. अनेक तक्रारकर्त्यांनी समाधान शिबिराप्रमाणे टोकन पद्धतीचा वापर करायला हवा होता, असे मत व्यक्त केले. म्हाडाच्या तक्रारींसंदर्भात वेगळी बैठक घेणार म्हाडासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी वेगळी बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. समाधानातील तक्रारीही पालकमंत्र्यांच्या दरबारी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी समाधान शिबिर घेण्यात आले होते. त्या शिबिरात तक्रार करून आपल्या गाऱ्हाणी मांडणाऱ्या अनेकांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारातही हजेरी लावली. केवळ हजेरीच लावली नाही तर पुन्हा नव्याने तक्रारीचे निवेदन सादर केले. मुख्यमंत्र्यांच्या शिबिरात असमाधान झाल्यानेच पालकमंत्र्यांच्या दरबारात हजेरी लावण्यात आल्याची चर्चा होती.