शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

वासनकर विरोधात तक्रारींचा ओघ

By admin | Updated: May 13, 2014 01:01 IST

हजारो ठेवीदारांना शेकडो कोटींचा गंडा घालणार्‍या वासनकर समूहाविरोधात तक्रारींचा ओघ वाढला आहे.

नागपूर : हजारो ठेवीदारांना शेकडो कोटींचा गंडा घालणार्‍या वासनकर समूहाविरोधात तक्रारींचा ओघ वाढला आहे. आज सकाळपासूनच गुन्हे शाखेत तक्रारकर्त्यांंंनी वासनकरच्या ‘फंडे‘गिरीचा पाढा वाचला.

अल्पावधीत दुप्पट, अडीचपट परताव्याचे आमिष दाखवून प्रशांत वासनकर आणि त्याच्या साथीदारांनी हजारो गुंतवणूकदारांकडून शेकडो कोटी रुपये गोळा केले. त्याने दिलेले पोस्टडेटेड चेक बाऊन्स झाल्याने ठेवीदारांमध्ये कुजबूज सुरू झाली. आपली रक्कम परत मागणार्‍या ठेवीदारांना वासनकरकडून केवळ आणि केवळ आश्‍वासने मिळत असल्यामुळे त्यांच्यात रोष निर्माण झाला. या पार्श्‍वभूमीवर, विवेक पाठक यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर शुक्रवारी गुन्हा दाखल केला. तेव्हापासून नागपूरच्या आर्थिक क्षेत्रात अन् ठेवीदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी वासनकर, त्याची पत्नी, भावासह नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यांच्या निवासस्थानी, कार्यालयात, फार्महाऊसमध्ये झडती घेऊन रोख, सोन्याचे दागिने आणि अन्य चीजवस्तूंसह सुमारे ७0 ते ८0 लाखांचा ऐवज जप्त केला. तक्रारकर्त्यांंंनो पुढे या, असे आवाहन पोलिसांनी केल्यामुळे आज सकाळपासूनच अनेक तक्रारकर्ते गुन्हे शाखेच्या कार्यालयात धडकले. रात्रीपर्यंंंत तब्बल डझनभर ठेवीदारांच्या पोलिसांनी तक्रारी नोंदवून घेतल्या तर, तेवढय़ाच ठेवीदारांचे बयान नोंदवून घेतले. पुराव्याची साखळी तयार केली जात आहे. त्यामुळे आणखी काही दिवस त्यांना अटक केली जाणार नाही. मात्र, वासनकर आणि अन्य आरोपींवर पोलीस २४ तास नजर ठेवून आहे, असे गुन्हे शाखेचे आधिकारी सांगत आहेत.

(प्रतिनिधी)