शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयातील दलालांचे धाबे दणाणले

By admin | Updated: June 7, 2015 02:42 IST

दलालाविरुद्ध करण्यात आलेल्या प्रशसनाच्या कडक कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील दलाल आणि त्यांच्याशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

कारवाईचा दणका : कर्मचाऱ्यांमध्ये पसरली भीती नागपूर : दलालाविरुद्ध करण्यात आलेल्या प्रशसनाच्या कडक कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील दलाल आणि त्यांच्याशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये आपल्यावरही करवाई होईल, अशी भीती पसरली आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालय दलालमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याचे परिणाम शुक्रवारी तब्बल ७ दलालांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून पकडण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांना पोलिसांच्या स्वाधीनही करण्यात आले. ३ दलालांना यापूर्वीच पकडण्यात आले होते. या कारवाईमुळे येथील दलालांचे धाबे तर दणाणलेच आहे. परंतु त्यांचे तार ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत जुळले आहेत त्यांचेही धाबे दणाणले आहे. येणाऱ्या काही दिवसात आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. (प्रतिनिधी)तो अधिकारी कोण? शुक्रवारी दलालांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान एका अधिकाऱ्याच्या कारमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्राचे निवेदन सापडले होते. पोलिसांनी त्या अधिकाऱ्याला विचारपूस करण्यासाठी सदर पोलीस ठाण्यातही बोलावले होते. तो अधिकार कोण, अशी चर्चा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होती.