लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून नागपुरात थंडीची सुरुवात झाली. दुसऱ्या पंधरवड्याच्या प्रारंभीच या हंगामातील सर्वात कमी तापमान नोंदले गेले. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी नागपुरात किमान तापमान १०.५ डिग्री सेल्सिअस इतके नोंदवले गेले, जो या हंगामातील सर्वात थंड दिवस ठरला. यासह थंडीचा आठ वर्षाचा जुना विक्रमही मोडला. २६ नोव्हेंबर २०१७ रोजी किमान तापमान १०.४ डिग्री सेल्सिअस नोंदवले होते. तर १० नोव्हेंबर २०१६ रोजी ९.८ डिग्री सेल्सिअस, जे या दशकातील सर्वात थंड दिवस होते.
नागपुरात ३० नोव्हेंबर १९१२ रोजी किमान तापमान ६.७ डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले होते, जे नोव्हेंबर महिन्यातील आजवरचे सर्वात कमी तापमान आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण भारतातील राज्यांमध्ये दिटवाह चक्रीवादळामुळे रविवारी आणि सोमवारी जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातही चक्रीवादळामुळे हालचाल वाढलेली दिसत आहे. त्यामुळे मध्य भारतातील तापमान आगामी एक ते दोन दिवसांत २ ते ३ डिग्रीने वाढण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे शनिवारी जे आकाश स्वच्छ झाले होते, ते रविवारी पुन्हा ढगांनी व्यापले. दुपारी सूर्यप्रकाशाची तीव्रता खूपच कमी झाली. यामुळे नागपुरातील दिवसाचे तापमान अंशतः घटून २७.४ अंशावर आले.
नागपुरात रविवारीही सकाळपासूनच थंड वाऱ्यांचा प्रभाव राहिला. सकाळी ११ वाजेपर्यंत आकाश स्वच्छ होते; पण त्यानंतर ढगांची गर्दी वाढली. दुपारी ३ वाजेपर्यंत ढगांच्या कारणाने अंधार दाटू लागला. ढगाळ वातावरणामुळे सूर्यास्तानंतर तापमान फार कमी घसरले नाही.
नोव्हेंबर महिन्यातील सर्वात थंड दिवस तारीख तापमान (सेल्सिअसमध्ये)
- १७ नोव्हेंबर - १०.५
- १६ नोव्हेंबर - १०.८
- १८ नोव्हेंबर - १०.९
- २९ नोव्हेंबर - ११.०
- ३० नोव्हेंबर - ११.४
- १४-१५ नोव्हेंबर - १२.०
- १० नोव्हेंबर - १२.२
- १३ नोव्हेंबर - १२.५
- ११-१२ नोव्हेंबर - १२.६
Web Summary : Nagpur experienced its coldest day this season, recording 10.5°C on November 17th, breaking an eight-year record. Cyclone activity in South India may briefly raise temperatures, but a cold December is expected.
Web Summary : नागपुर में इस मौसम का सबसे ठंडा दिन 17 नवंबर को दर्ज किया गया, तापमान 10.5 डिग्री सेल्सियस रहा, जो आठ साल का रिकॉर्ड तोड़ गया। दक्षिण भारत में चक्रवात के कारण तापमान में थोड़ी वृद्धि हो सकती है, लेकिन दिसंबर में ठंड बढ़ने की आशंका है।