शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगाराच्या मृत्यूने कापड गिरणीत तणाव

By admin | Updated: July 20, 2014 01:10 IST

स्थानिक आर.एस.आर. मोहता मिल्स या कापड गिरणीत कमलाकर वामनराव ढगे (५८) रा. बिडकर वॉर्ड या कंत्राटी कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास

हिंगणघाट : स्थानिक आर.एस.आर. मोहता मिल्स या कापड गिरणीत कमलाकर वामनराव ढगे (५८) रा. बिडकर वॉर्ड या कंत्राटी कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संतप्त कामगारांनी उद्योग व्यवस्थापनाविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. दुपारी ३.३० वाजतापर्यंत सुरू असलेल्या वाटाघाटीअंती व्यवस्थापनाने नमती भूमिका घेत मृतकाच्या कुटुंबीयांना सात लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मान्य केले. यातील दोन लाख रुपये घटनास्थळी आणि उर्वरित पाच लाख कामगार न्यायालयात देणार असे ठरले. यानंतर कामगारांनीही आंदोलन मागे घेतल्याने तणाव निवळला. तब्बल साडेसहा तासांनी पोलिसांनी मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी घटनास्थळावरुन हलविला.प्राप्त माहितीनुसार, आर.एस.आर. मोहता मिल्स या कापड गिरणीत कमलाकर ढगे हा कंत्राटी कामगार सकाळी ७ वाजताच्या पहिल्या पाळीत कामावर गेला होता. काम करीत असताना दोन तासांनी अचानक तो भोवळ येऊन जागीच कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही वार्ता गिरणीत पसरताच कामगारांनी हातची कामे टाकून घटनास्थळ गाठल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. शहरातही या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. माहिती मिळताच ठाणेदार मोतीराम बोडखे यांनी पोलीस ताफ्यासह धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करण्याचा प्रयत्न केला. संतप्त कामगारांनी मृतकाच्या कुटुंबीयांना १५ लाख नुकसान भरपाई द्यावी. तसेच उद्योगाचे अध्यक्ष यादव यांना मृत्यूस जबाबदार धरून त्यांच्यावर पोलीस कारवाई करावी, तोपर्यंत घटनास्थळावरुन मृतदेह उचलू न देण्याचा पवित्रा घेतला. दुपारी ३ वाजतापर्यंत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याची इशाराही कामगारांनी दिल्यामुळे व्यवस्थापन पेचात पडले. अखेर कामगार आणि व्यवस्थापनात झालेल्या वाटाघाटीनंतर समेट घडून आला. या वाटाघाटीत कामगार नेते आफताब खान, मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्यासह काही कामगारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मृत कामगार गत ३० वर्षांपासून याच उद्योगात कंत्राटी कामगार म्हणून पवार नामक कंत्राटदाराकडे कामाला होता.(तालुका प्रतिनिधी)