शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

निधी टंचाईत अडकले स्वच्छ भारत अभियान

By admin | Updated: December 22, 2016 02:40 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१४ रोजी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली होती.

उद्दिष्ट कसे गाठणार?: वर्षभरापासून अनुदानाची प्रतीक्षा गणेश हूड नागपूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१४ रोजी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली होती. नागपूर शहरातही या अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागपूर शहर हागणदरीमुक्त करण्याची घोषणा केली होती. एवढेच नव्हे तर शौचालयासाठी शासन अनुदानाव्यतिरिक्त महापालिकेच्या तिजोरीतून प्रत्येकी चार हजार रुपये वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु वर्षभरापासून लाभार्थीना अनुदानाचा दुसरा हप्ता प्राप्त झालेला नाही. निधी टंचाईत अभियान अडल्याचे चित्र आहे. केंद्र व राज्य शासनाकडून वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी १२ हजारांचे अनुदान दिले जाते. परंतु या रकमेत बांधकाम शक्य नसल्याने महापालिकेने चार हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला. वाढीव अनुदानाचा निर्णय घेतल्याने शहरातील १५ हजार ११८ लोकांनी शौचालय अनुदानासाठी महापालिकेकडे अर्ज केलेले आहेत. यातील १० हजार १०३ अर्ज मंजूर करण्यात आले तर गेल्या दोन वर्षात ४ हजार ७०७ शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या संदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शहरातील शेकडो लाभार्थींना अनुदानाचा दुसरा हप्ताच मिळालेला नाही. गेल्या वर्षभरापासून लाभार्थी या संदर्भात झोन कार्यालयाकडे तक्रारी करीत आहेत. परंतु प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याची व्यथा या लोकांनी मांडली. लकडगंज झोनमधील सूरजनगर येथील संतोष जागडे, गणेश भुजाडे, ममता फुले, निर्मला भुयारकर, संतन वंदघरे, हेमंत खोब्रागडे, राजकुमार सोनटक्के, धनपाल बोरकर, अशोक घाबर्डे आदींना वर्षभरापासून अनुदानाचा दुसरा हप्ता मिळाला नसल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र शासनाकडून जानेवारी २०१७ मध्ये नागपूरसह देशातील ५०० शहरांमध्ये स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शहर स्वच्छ राहावे, यासाठी नागरिकांनी जर ‘स्वच्छता अ‍ॅप’ आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून यावर नोंदवावयाच्या आहेत. तसेच शहर हागणदरीमुक्त असणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु आर्थिक टंचाईत शहर हागणदरीमुक्त कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकही प्रकरण प्रलंबित नाही शहर हागणदारीमुक्त करण्यासंदर्भात आयुक्त गंभीर आहेत. शौचालयाचा एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही, असे त्यांनी मंगळवारी बैठकीत निर्देश दिलेले आहेत. महापालिका मुख्यालयाकडे एकही अर्ज प्रलंबित नाही. अनुदानाचा हप्ता थकला असल्यास या संदर्भात झोन कार्यालयांकडून माहिती घेऊ. -जयंत दांडेगावकर, अतिरिक्त उपायुक्त महापालिका बैठकीत तापणार प्रकरण लकडगंज झोनमधील १२४ लाभार्थींचे अर्ज वर्षभरापूर्वी मंजूर करण्यात आले होते. परंतु यातील ९४ लाभार्थींना अद्यापही दुसरा हप्ता मिळालेला नाही. महापालिका मुख्यालयाकडे यासंदर्भात माहिती उपलब्ध नाही. अन्यायग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी गुरुवारी झोनमधील लाभार्थींची बैठक आयोजित केली आहे. गरीब लाभार्थींना न्याय न मिळाल्यास आंदोलन करू, असा इशारा शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष अ‍ॅड. यशवंत मेश्राम, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेश देशभ्रतार व बंडू बोरकर यांनी दिला आहे.