शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंद्यांवर नागरिकांनी लक्ष ठेवावे!

By admin | Updated: November 4, 2014 01:00 IST

गावातील अवैध धंद्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस पाटील आणि त्या गावातील प्रत्येक नागरिकांची आहे. यासोबतच गावात अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास त्याची माहिती

पोलीस अधीक्षक : मौदा पोलीस ठाण्यात पोलीस पाटील, नागरिकांशी चर्चानागपूर : गावातील अवैध धंद्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस पाटील आणि त्या गावातील प्रत्येक नागरिकांची आहे. यासोबतच गावात अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला द्यावी. त्यामुळे गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविता येईल, असे मत पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी व्यक्त केले.मौदा पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटलांची त्यांनी बैठक घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीमध्ये चिरव्हा, माथनी, गुमथळा, राहडी, पावडदौना, भूगाव, वरंबा, आसलवाडा, मांगली नांदा, रानमांगली, सुकळी, अंबाडी, एकर्डी, दिघोरी, सोनेगाव राजा, गारली, सावळी, दहेगाव, निहारवानी, धामणगाव, बोरगाव, महादुला, मोहखेडी, मोहाडी, नांदगाव, चितापूर, कुंभारी, मांगली गोसावी, नवेगाव (रेल्वे), कुंभापूर, शिवनी, चारभा, इटघाट, मोहगाव, सुंदरगाव, कोपरा, हिवराबली, डहाडी, भेंडाळा आदी गावातील पोलीस पाटील आणि नागरिक उपस्थित होते. यासोबतच पत्रकारांकडून परिसरातील समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्यासंबंधी त्यांनी आदेश दिले. यानंतर मौदा पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षकांनी पोलीस दरबार घेतला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पोलीस क्वॉर्टर निकामी, नादुरुस्त, पडक्या स्थितीत असल्याचे अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्याची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी पोलीस वसाहतीची पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कांतेवार, चव्हाण, ढवळे, ठाणेदार गायगोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)