लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:06 IST2020-11-29T04:06:42+5:302020-11-29T04:06:42+5:30

बुटीबाेरी : विवाहित महिलेशी आधी प्रेमसंबंध व नंतर लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्थापित करून तिला घटस्फाेट देण्यास भाग पाडले. ...

Cheating on a woman by showing her the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

बुटीबाेरी : विवाहित महिलेशी आधी प्रेमसंबंध व नंतर लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्थापित करून तिला घटस्फाेट देण्यास भाग पाडले. नंतर लग्न करण्यास नकार देत तिची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार बुटीबाेरी येथे घडला असून, प्रकरण पाेलिसात पाेहाेचले आहे.

अक्षय रामभाऊ आगलावे (२६, वाकेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव असून, ताे सध्या बुटीबाेरी येथे राहताे. त्याने बुटीबाेरी येथील विवाहित महिलेशी ओळख करून प्रेमसंबंध जुळवले. तिच्याशी लग्न करण्याची बतावणी करीत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्याने त्यांच्या संबंधाची माहिती तिच्या नातेवाईकांना देत तिला घटस्फाेट देण्यास भाग पाडले. तिने घटस्फाेट घेतल्यानंतर मात्र त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि ३७६ (२), (एन), ४२० अन्वये गुन्हा दाखल करून आराेपीस अक्षयला अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक चाैधरी करीत आहेत.

Web Title: Cheating on a woman by showing her the lure of marriage