बुटीबाेरी येथील माेबाईल शाॅपमध्ये चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST2021-02-06T04:15:47+5:302021-02-06T04:15:47+5:30

बुटीबाेरी : चाेरट्याने माेबाईल शाॅपमध्ये प्रवेश करून आतील ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना बुटीबाेरी येथे ...

Chari in the mobile shop at Butibari | बुटीबाेरी येथील माेबाईल शाॅपमध्ये चाेरी

बुटीबाेरी येथील माेबाईल शाॅपमध्ये चाेरी

बुटीबाेरी : चाेरट्याने माेबाईल शाॅपमध्ये प्रवेश करून आतील ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना बुटीबाेरी येथे गुरुवारी (दि. ४) मध्यरात्री घडली.

अंकित शंकर तिवारी (२६, रा. वर्धमान नगर, बुटीबाेरी) याचे बुटीबाेरी येथील बाेरकुटे काॅम्प्लेक्समध्ये माेबाईल दुकान आहे, चाेरट्याने तिथे कुणीही नसताना शटर ताेडून दुकानात प्रवेश केला. यात त्याने दुकानातील १५ हजार रुपयांचा टीव्ही, २० हजार रुपयांचा लॅपटाॅप, १० हजार रुपयांचे १५० नग चार्जर, सात हजार रुपयांचे २०० नग हेडफाेन, सहा हजार रुपयांचे १३ नग नेक बेल्ट हेडफाेन तसेच चार हजार रुपयांचे दुरुस्तीला आलेले जुने १२ माेबाईल हॅण्डसेट असा एकूण ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. दुकानात चाेरी झाल्याचे लक्षात येताच त्याने पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार मिलिंद नांदूरकर करीत आहेत.

Web Title: Chari in the mobile shop at Butibari