शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या काही जागांमध्ये बदल शक्य

By admin | Updated: June 15, 2014 00:34 IST

येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहील, अशी आशा व्यक्त करून काही जागांमध्ये मात्र अदलाबदल होण्याची शक्यता राष्ट्रवादी

पटेलांचे सुतोवाच : लवकरच रणनीती
गोंदिया : येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहील, अशी आशा व्यक्त करून काही जागांमध्ये मात्र अदलाबदल होण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.
राज्यसभेवर अविरोध निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच गोंदियात आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी लोकसभा निवडणुकीतील आघाडी पक्षांच्या पराभवापासून तर आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी दिलखुलास चर्चा केली.
आगामी निवडणुकीबद्दलची रणनिती लवकर ठरणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने किती जागा लढवायच्या आणि कोणकोणत्या जागा लढवायच्या हे अजून निश्चित झालेले नसल्याचे खा.पटेल म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राकाँ आघाडीतील पक्षांना हार पत्करावी लागली असली तरी विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र राहू शकते. लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने आघाडीतील पक्षांच्या उमेदवारांची हार झाली ते अपेक्षित नव्हते. मात्र राष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीने केंद्र सरकारविरूद्ध भ्रष्टाचार, अकार्यक्षमता व महागाईच्या मुद्यावरून दोन ते तीन वर्षांपासून मोहीम चालविली जात होती, त्याला वेळीच उत्तर द्यायला पाहीजे होते. वास्तविक परिस्थिती वेगळी असताना काँग्रेसबहुल सरकारने त्यावर स्पष्टीकरण देण्यास टाळाटाळ केल्यामुळे खरी बाजू जनतेसमोर आलीच नाही आणि जे आरोप होतात त्यालाच खरे समजून लोकांनी आपली मानसिकता तयार केली, असे खा.पटेल यावेळी म्हणाले. नवीन सरकारकडून लोकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. परंतू हे सरकार युपीए सरकारपेक्षा वेगळे काहीतरी करेल आणि विकासगंगा खेडोपाडी पोहोचवेल असे काहीही होण्याची शक्यता नसल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)