शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तात्काळ तिकिटाच्या वेळापत्रकात बदल

By admin | Updated: June 13, 2015 02:59 IST

तात्काळ तिकिटाच्या वेळापत्रकात रेल्वे मंत्रालयाने बदल केला असून १५ जूनपासून प्रवासाच्या एक दिवसापुर्वी सकाळी १० वाजेपासून वातानुकूलित कोचचे तर ११ वाजेपासून स्लिपर क्लासचे तात्काळचे तिकीट घेता येईल.

दलालांवर अंकुश : १० वाजता एसीचे, ११ पासून स्लिपरचे होणार आरक्षणनागपूर : तात्काळ तिकिटाच्या वेळापत्रकात रेल्वे मंत्रालयाने बदल केला असून १५ जूनपासून प्रवासाच्या एक दिवसापुर्वी सकाळी १० वाजेपासून वातानुकूलित कोचचे तर ११ वाजेपासून स्लिपर क्लासचे तात्काळचे तिकीट घेता येईल. दरम्यान प्रवासी तिकीट सुविधा केंद्र, रेल ट्रॅव्हल सर्व्हिस एजंट, आयआरसीटीसीच्या एजंटला तात्काळ तिकिटाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ३० मिनिटानंतर तात्काळ तिकीट घ्यावे लागणार आहे.रेल्वे प्रवासाच्या एक दिवस आधी सकाळी १० वाजता तात्काळचे तिकीट खरेदी करण्याची सुविधा पूर्वी होती. परंतु एजंट आणि सर्व सामान्य नागरिक एकाच वेळी तात्काळ तिकिटासाठी प्रयत्न करीत असल्यामुळे बहुतांश नागरिकांना तात्काळच्या रांगेत उभे राहुनही कन्फर्म तिकीट मिळत नव्हते. यात स्लिपरक्लास आणि एसी कोचसाठी तात्काळचे तिकीट खरेदी करण्याच्या वेळा वेगवेगळ्या करण्यात आल्या आहेत. एसी कोचचे तात्काळ तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना १० वाजेपासून तर स्लिपरचे तात्काळ तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना ११ वाजेपासून तिकीट खरेदी करता येणार आहे. यात आयआरसीटीसीचे एजंट, प्रवासी तिकीट सुविधा केंद्राचे एजंट आणि रेल ट्रॅव्हल सर्व्हिस एजंटला तात्काळची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ३० मिनिटे तिकीट खरेदी करता येणार नाही. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे सर्व सामान्य नागरिकांना तात्काळचे ‘कन्फर्म’ तिकीट मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)