शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर पोलीस अधीक्षकांच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: November 14, 2014 00:47 IST

माजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांना अपमानास्पद वागणूक देणे व अन्य विविध बेकायदेशीर कृत्यांचा आरोप असलेले चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक राजीव जैन यांची विशेष पोलीस

हायकोर्ट : माजी मंत्री शांताराम पोटदुखे यांचा अवमाननागपूर : माजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांना अपमानास्पद वागणूक देणे व अन्य विविध बेकायदेशीर कृत्यांचा आरोप असलेले चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक राजीव जैन यांची विशेष पोलीस महानिरीक्षकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. चौकशी अहवाल सादर करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांना गेल्या ४ फेब्रुवारी रोजी तडीपारीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल करून जैन यांच्यावर विविध आरोप केले आहेत. नोटीसमध्ये जयस्वाल यांच्याविरुद्ध दाखल विविध गुन्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. काही गुन्ह्यांचे खटले प्रलंबित असून काही गुन्ह्यांतून त्यांना आरोपमुक्त करण्यात आले आहे. यामुळे त्यांना तडीपार केले जाऊ शकत नाही, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. जयस्वाल यांच्यावर पोलिसांचा राग आहे. ते जयस्वाल यांना धडा शिकविण्याची संधी शोधत होते. गेल्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात जैन यांनी पोटदुखे यांचा अवमान केला होता. यामुळे जयस्वाल यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी जैन यांच्यासोबत वाद घातला होता. परिणामी जयस्वाल यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)