सभापतींचे आदेश धाब्यावर

By Admin | Updated: May 27, 2014 01:41 IST2014-05-27T01:41:11+5:302014-05-27T01:41:11+5:30

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सभापतींचा अधिकारी व कर्मचार्‍यांवर वचक राहिलेला नाही. त्यामुळेच सभापतींनी आदेश दिल्यानंतरही विविध योजनांची माहिती मिळत नसल्याची वित्त समिती

The chairmanship of the chairmen | सभापतींचे आदेश धाब्यावर

सभापतींचे आदेश धाब्यावर

जिल्हा परिषद : आदेशानंतरही सदस्यांना माहिती मिळत नाही

नागपूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सभापतींचा अधिकारी व कर्मचार्‍यांवर वचक राहिलेला नाही. त्यामुळेच सभापतींनी आदेश दिल्यानंतरही विविध योजनांची माहिती मिळत नसल्याची वित्त समिती सदस्यांची तक्र ार आहे. जि.प.च्या विविध योजनांसाठी वित्त विभागामार्फ त उपलब्ध निधी खर्च केला जातो. परंतु खरोखरच योजनांचा लाभ गरजूंना मिळतो का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान व्हावे, यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फ त इंग्रजी शिकवणी वर्ग घेण्यात आले. यावर लाखों रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. या योजनेला लाभ किती विद्यार्थ्यांना मिळाला. कोणत्या गावातील किती लाभार्थी आहेत या संदर्भात माहिती देण्याची मागणी वित्त समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली. सभापतींनी अधिकार्‍यांना माहिती उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. परंतु मागील तीन महिन्यापासून सदस्य माहितीची प्रतीक्षा करीत आहे. जि.प.च्या पाणीपुरवठा विभागामार्फ त योजना राबविताना निविदातील रकमेपेक्षा जादा खर्च करण्यात आला. कोणकोणत्या योजनांवर जादा निधी खर्च झाला. याची माहिती सभापतींच्या आदेशानंतरही मिळत नाही. वित्त समितीच्या बैठकीत सदस्य वारंवार हा मुद्दा उपस्थित करतात. परंतु माहिती मिळत नसल्याची व्यथा सदस्यांनी मांडली. असाच प्रकार जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत घडला. सदस्यांनी दहेगाव रंगारी येथील बंधार्‍यांच्या निकृष्ट कामाचा मुद्दा उपस्थित केला. सदस्यांच्या तक्र ारींची दखल घेत अधिकार्‍यांना धारेवर धरण्याची गरज होती. परंतु काम दर्जेदार झाल्याचा निर्वाळा देण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: The chairmanship of the chairmen