शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

उपाध्यक्षाच्या खुर्चीला ‘नाट’

By admin | Updated: October 10, 2016 02:35 IST

जिल्हा परिषदेत उपाध्यक्षांचा मान मोठा असला तरी, हे पद मात्र अनेकांसाठी धोकादायक ठरले आहे. जि.प.मध्ये

अनेकांचे पुढचे राजकारण धोक्यात : आरक्षणाने नाडले मंगेश व्यवहारे ल्ल नागपूर जिल्हा परिषदेत उपाध्यक्षांचा मान मोठा असला तरी, हे पद मात्र अनेकांसाठी धोकादायक ठरले आहे. जि.प.मध्ये ज्यांनी उपाध्यक्ष पदाचा मान पटकाविला, त्यांचे पुढचे राजकारणच धोक्यात आले आहे. एकाचा सर्कलच राहला नाही. तर दुसऱ्याला आपला सर्कल गमवावा लागला. २०१२ ते २०१७ या कालावधीत जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रशेखर चिखले व शिवसेनेचे शरद डोणेकर यांना उपाध्यक्षाची संधी लाभली. शरद डोणेकर हे कन्हान-पिपरी सर्कलमधून निवडून आले होते. मात्र कन्हान नगर परिषद झाल्याने नव्या रचनेत त्यांचा सर्कलच राहिला नाही तर चंद्रशेखर चिखले यांचा मेटपांजरा सर्कल हा सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाल्याने या दोघांचीही सर्कल शोधात धावपळ होत आहे. अडीच दशकापासून ही परंपरा कायम आहे. जि.प.चे अध्यक्षपद लाभलेले सदस्य आमदारकीपर्यंत पोहचले. परंतु बहुतांश उपाध्यक्षांना पायउतारच व्हावे लागले. यातील काही उपाध्यक्ष राजकारणातून लुप्त होत आहे. सदानंद निमकर हे १९९७ पर्यंत उपाध्यक्ष होते. नंतर ते जि.प.मधूनच गायब झाले. राष्ट्रवादीचे बंडोपंत उमरकर हे दोन वर्ष उपाध्यक्ष राहिले. त्यानंतर ते सदस्य म्हणून निवडणुन आले. परंतु पदापासून वंचित राहिले. अखेर त्यांचे सर्कल आरक्षित झाले. २०१२ पासून ते जिल्हा परिषद बाहेर आहे. १९९८-९९ मध्ये उपाध्यक्ष असलेले चरणसिंग ठाकूर यांना जि.प. मधून नगर परिषदेमध्ये जावे लागले. २००२ ते २००५ या कालावधीत उपाध्यक्ष असलेले शेषराव रहाटे हे परत जि.प. दिसले नाही. ज्ञानेश्वर साठवणे उपाध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांची हत्या झाली. २००७ ते ०९ दरम्यान उपाध्यक्ष असलेले तापेश्वर वैद्य यांना २०१२ च्या निवडणुकीत मात खावी लागली. राष्ट्रवादीचे नितीन राठी यांनी उपाध्यक्ष असताना अनेक चांगले काम केले. परंतु त्यांनाही २०१२ च्या निवडणुकीत आरक्षणाचा फटका बसला. आणि या टर्मच्या आजी-माजी उपाध्यक्षांना आपले सर्कल गमवावे लागले. रमेश मानकर अपवाद १९९९ ते २००२ मध्ये रमेश मानकर हे जि.प. चे उपाध्यक्ष होते. त्यांच्यासाठी हे पद प्रगतीचे ठरले. त्यांना पुढे अध्यक्ष म्हणून बढतीही मिळाली. परंतु २०१२ मध्ये त्यांचे सर्कल महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांनाही जि.प.चा नाद सोडावा लागला.