शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

वजनमाप चाेरणाऱ्या चाैघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : वेकाेली काेळसा खाणीच्या स्टाेअर रूममधून वजनमाप चाेरून नेणाऱ्या चाैघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कन्हान : वेकाेली काेळसा खाणीच्या स्टाेअर रूममधून वजनमाप चाेरून नेणाऱ्या चाैघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून प्रत्येकी २० किलाे वजनाचे २५ नग वजनमाप व ऑटाे असा एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. ११) दुपारी कन्हान (ता. पारशिवनी) परिसरात करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये राधे मेश्राम (२२), शुभम राऊत (२०), अजय गौतम (२९) तिघेही रा. कन्हान, ता. पारशिवनी व सोनू साहू (१९, रा. कळमना वस्ती, नागपूर) या चाैघांचा समावेश आहे. कन्हान लगतच्या वेकाेलीच्या ओसीएम कोळसा खाणीच्या स्टोअर रूममधून २५ नग वजनमाप चाेरीला गेल्याचा प्रकार गुरुवारी (दि. ९) रात्री घडला असून, शुक्रवारी (१०) सकाळी उघड झाला. त्यामुळे कन्हान पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा कन्हान पाेलिसांसाेबतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपासाला सुरुवात केली.

या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरुवातीला राधे, शुभम व अजयला ताब्यात घेत चाैकशी सुरू केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देताच साेनूला ताब्यात घेत चाैघांना अटक केली. त्यांच्याकडून प्रत्येकी २० किलाे वजनाचे २५ नग वजनमाप व एमएच-४०/बीएफ-०२३६ क्रमांकाचे मालवाहू वाहन असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, सहायक फाैजदार साहेबराव बहाळे, वीरेंद्र नरड, विनोद काळे, नाना राऊत, शैलेश यादव, सत्यशील कोठारे, प्रणय बनाफर यांच्या पथकाने केली. या घटनेचा पुढील तपास कन्हान पाेलीस करीत आहेत.