शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने उच्च न्यायालयात जमा केले २५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:33 IST

मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने न्यायालयात २५ कोटी रुपये जमा केले आहे. जमा करण्यात येणारी रक्कम ही महामार्गाच्या दुरूस्तीसाठी अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाला सोपविण्यात येईल.

ठळक मुद्देमहामार्गाची दुरुस्ती व देखभालीचा नियोजनबद्ध कार्यक्रम दिला नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने न्यायालयात २५ कोटी रुपये जमा केले आहे. गेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हे आदेश अमरावती ते मलकापूर व वर्धा ते सिंदखेड राजा या महामार्गाच्या दुरूस्ती व देखभालीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम ५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्यासाठी दिले होते. न्यायालयाने स्पष्ट केले होतो की, जमा करण्यात येणारी रक्कम ही महामार्गाच्या दुरूस्तीसाठी अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाला सोपविण्यात येईल.बुधवारी या प्रकरणी न्यायमूर्ती रवि देशपांडे व न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. दरम्यान केंद्र सरकारने माहिती दिली की, केंद्र सरकारच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या राज्यातील १० किलोमीटर लांबीचे राज्य महामार्ग राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात आले आहे. सोबतच वर्धा ते सिंदखेड राजा व बडनेरा ते धुळे मार्ग राज्य सरकारला हस्तांतरित केला आहे. यासंदर्भात अ‍ॅड. अरुण पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली होती. गेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने केंद्र सरकारला इशारा दिला होता की, २५ कोटी रुपये जमा न केल्यास संबंधित विभागाच्या सचिवाला प्रत्यक्ष न्यायालयापुढे उपस्थित रहावे लागेल. प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. काय आहे प्रकरणयाचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, दोन्ही महामार्ग अतिशय खराब झाले आहे. अपघात वाढले आहे. वाहन चालकांना भरपूर त्रास होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. न्यायालयाने अमरावती ते मलकापूर महामार्गाच्या कामाची माहिती घेण्यासाठी समितीचे गठन केले होते. या समितीने न्यायालयात अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार या रस्त्यावर बरेच काम अपूर्ण आहे. त्याला तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार