शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ विभागातील लोकोपायलटला परत बोलवा

By admin | Updated: May 12, 2014 01:00 IST

सहा महिन्यासाठी भुसावळला पाठविलेले लोकोपायलट दोन वर्ष होऊनही परतले नाहीत. यामुळे नागपूर विभागात २५० लोकोपायलटची पदे रिक्त झाली असून कार्यरत लोकोपायलटवर कामाचा ताण वाढला आहे.

नागपूर : सहा महिन्यासाठी भुसावळला पाठविलेले लोकोपायलट दोन वर्ष होऊनही परतले नाहीत. यामुळे नागपूर विभागात २५० लोकोपायलटची पदे रिक्त झाली असून कार्यरत लोकोपायलटवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे बाहेर पाठविलेले लोकोपायलट त्वरित परत बोलवावे या आणि इतर मागण्यांसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे गार्ड आणि लोकोपायलट लॉबीसमोर एक दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील १२७ लोकोपायलट जून २०१२ मध्ये ६ महिन्यांसाठी भुसावळ विभागात पाठविले. परंतु एप्रिल २०१४ पर्यंत हे लोकोपायलट भुसावळ विभागाने परत केले नाहीत. नागपूर विभागात २५० लोकोपायलटची पदे रिक्त होऊन कार्यरत लोकोपायलटवर कामाचा ताण वाढला. त्यांना सुट्या मिळणे बंद होऊन ओव्हरटाईम करण्याची पाळी आली आहे. यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. याशिवाय आमला छिंदवाडा हा सेक्शन मध्य रेल्वेचा आहे. तेथे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आमला-छिंदवाडा-आमला ही गाडी चालविते. या मोबदल्यात गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस आणि गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस या दोन गाड्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने मध्य रेल्वेला देण्याचे मान्य केले होते. परंतु या दोन गाड्या दिल्या नसल्यामुळे आमला-छिंदवाडा-आमला ही गाडी मध्य रेल्वेच्या ताब्यात द्यावी, ही मागणी आंदोलनात करण्यात आली. याशिवाय नरखेड-अमरावती-नरखेड हा ९० किलोमीटरचा मार्ग मध्य रेल्वेच्या तर ३० किलोमीटरचा मार्ग भुसावळ रेल्वेच्या अखत्यारीत आहे. परंतु नरखेड-अमरावती ही गाडी भुसावळ विभाग चालवितो. त्यामुळे या गाडीच्या चार फेर्‍या नागपूर विभागाला आणि एक फेरी भुसावळ विभागाला देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नागपूर विभागात गार्डची एकून ५६० मंजूर पदे असून त्यातील ११० पदे रिक्त आहेत. त्यामुळे गार्डला सुट्या मिळत नसून त्यांनाही लोकोपायलटप्रमाणे ओव्हरटाईम करावा लागत आहे. त्यामुळे गार्डची रिक्त पदे त्वरित भरण्याचा मुद्दा आंदोलनात रेटून धरण्यात आला. आंदोलनातील मागण्यांवर १५ दिवसात उपाययोजना न केल्यास निर्णायक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे विभाग अध्यक्ष आर. एन. चांदुरकर, विभागीय सचिव विनोद चतुर्वेदी, विभाग संघटक देबाशीष भट्टाचार्य, शाखा सचिव वीरेंद्र सिंग यांच्या नेतृत्वात असंख्य लोकोपायलट उपोषणावर बसले होते. (प्रतिनिधी)