शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

कॉफी मशीनचा स्फोट

By admin | Updated: December 3, 2015 03:12 IST

एका लग्नसमारंभात कॉफी मशीनचा स्फोट झाल्याने मशीनजवळ असलेल्या एका १० वर्षीय मुलीसह चौघे जखमी झाले.

नागपूर : एका लग्नसमारंभात कॉफी मशीनचा स्फोट झाल्याने मशीनजवळ असलेल्या एका १० वर्षीय मुलीसह चौघे जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री विद्यापीठ कॅम्पस ते अंबाझरी उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गुरुनानक भवनसमोर घडली. कॅम्पस ते अंबाझरी दरम्यानच्या रोडवर गुरुनानक भवनसमोर मराठा सावजी नावाचे लॉन आहे. येथे बुधवारी सायंकाळी यादव आणि घाटे कुटुंबीयांमध्ये लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. लग्न समारंभातील आनंददायी वातावरणात सर्वच आपापल्या कामात व्यस्त होते. कुणी भोजन करीत होते तर कुणी कुटुंबीयांसोबत चर्चेत मग्न होते. दरम्यान रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास अचानक कॉफी मशीनचा स्फोट झाला. यावेळी कॉफी मशीनजवळ उभी असलेल्या श्रावणी तारेकर (१०), मिथिलेश कठाणे (१६) आणि अनुज राऊत (१५) व कॉफी मशिन आॅपरेटर देवेंद्र परिहार (२१) हे जखमी झाले. त्यांना खामला चौकातील आॅरेंजसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात श्रावणीचा हात तुटून पडला. या घटनेनंतरही लग्नसमारंभ सुरू असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याशिवाय आणखी तिघे जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची सूचना मिळताच अंबाझरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (प्रतिनिधी)