गावसूत येथे दाेन ठिकाणी घरफाेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:09 IST2021-08-15T04:09:54+5:302021-08-15T04:09:54+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क उमरेड : अज्ञात चाेरट्याने एकाच रात्री दाेन ठिकाणी घरफाेडी केल्याची घटना उमरेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गावसूत ...

Burglary at the right place at Gavasut | गावसूत येथे दाेन ठिकाणी घरफाेडी

गावसूत येथे दाेन ठिकाणी घरफाेडी

लाेकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : अज्ञात चाेरट्याने एकाच रात्री दाेन ठिकाणी घरफाेडी केल्याची घटना उमरेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गावसूत येथे शुक्रवारी (दि.१३) उघडकीस आली. राेख रक्कम, जुने वापरातील साेन्याचे दागिने असा दाेन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला.

गुरुवारी (दि.१२) रात्रीच्या सुमारास गाैतम सूर्यभान मेंढे (४०, रा. गावसूत, ता. उमरेड) यांच्या घरात चाेरट्याने प्रवेश केला. यात चाेरट्याने घरातील दाेन खाेलीतील कपाटाचे कुलूप ताेडून लाॅकरमध्ये ठेवलेले जुने वापरातील साेन्याचे दागिने किंमत ५४ हजार रुपये, राेख ३५ हजार रुपये तसेच दुसऱ्या कपाटातील राेख ११ हजार रुपये असा एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. दरम्यान, गाैतम मेंढे यांची पत्नी उठली असता, तिला दाेन्ही खाेलीतील कपाट उघडे दिसून आले व तेथील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले.

तसेच याच रात्री गावातील लताबाई चाैधरी यांच्या घरीसुद्धा चाेरट्याने डाव साधला. चाैधरी यांच्या घरातून ६३ हजार रुपये किमतीचे जुने वापरातील साेन्याचे दागिने, राेख २० हजार रुपये असा एकूण ८३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच विठ्ठल वालकटे यांच्या मालकीचा ११ हजार रुपये किमतीचा ॲन्ड्राॅईड माेबाईल हॅण्डसेट चाेरून नेला. दाेन्ही ठिकाणाहून एकूण १ लाख ९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन चाेरट्याने पाेबारा केला.

याप्रकरणी गाैतम सूर्यभान मेंढे यांच्या तक्रारीवरून उमरेड पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, चाेरट्याचा शाेध सुरू केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक राजू डाेर्लीकर करीत आहेत.

Web Title: Burglary at the right place at Gavasut