शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीचा ‘लूक’ बदलणार

By admin | Updated: August 2, 2015 03:09 IST

महात्मा फुले भाजी बाजाराच्या इमारतीची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिले.

महात्मा फुले भाजीबाजार : पालकमंत्री बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश नागपूर : महात्मा फुले भाजी बाजाराच्या इमारतीची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिले. रविभवन येथे आयोजित एका बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महात्मा फुले भाजी बाजाराच्या इमारतीबाबतची स्थिती जाणून घेतली. त्यानंतर उपरोक्त निर्देश दिले. यावेळी आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, मनपा स्थायी समिती अध्यक्ष रमेश शिंगारे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर प्रामुख्याने उपस्थित होते. ५ वर्षे टिकेल अशा पद्धतीने इमारतीच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करावे, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली. सध्या इमारतीवरील झाडे कापण्यात आली. अनेक ठिकाणी प्लॅस्टर करून इमारतीची डागडुजी करण्यात आली आहे. गडरच्या टाक्या, शौचालय व बाथरुमची दुरुस्ती करण्यात आली आहे, असे या बैठकीत हर्डीकर यांनी सांगितले. महात्मा फुले बाजार १२ एकर परिसरात पसरलेला आहे. यातील २.३० एकर जागेवर दर्शनी भागात महात्मा फुले बाजार भवन, ४.३० एकर जागेवर कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूरतर्फे नियंत्रित भाजी बाजार व ५.४० एकर जागेवर सार्वजनिक वाहन तळ आहे. महात्मा फुले बाजारात पूर्वी १९९२ पर्यंत भाजी व फळांची ठोक व चिल्लर विक्री होत असे. १९९० मध्ये नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कळमना येथे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ व केंद्र अस्तित्वात आल्याने महात्मा फुले बाजारातील आलू कांद्याचा ठोक व्यवसाय तिथे हलविण्यात आला. परंतु भाजीपाल्याचा ठोक व चिल्लर विक्री व्यवसाय येथेच सुरू आहे. नागपूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी ३१ डिसेंबर १९९२ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार भाजीपाल्याचे खरेदी विक्री मुख्य बाजार क्षेत्र कळमना बाजार म्हणून घोषित केलेले आहे. २१ डिसेबर २००१ रोजी अधिसूचना काढून महात्मा भाजीबाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा दुय्यम बाजार म्हणून यापुढेही अस्तित्वात राहील, असे जाहीर केले आहे. सद्य परिस्थितीत फुले मार्केट येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचा भाजी उपबाजार २१ डिसेंबर २००१ च्या अधिसूचनेनुसार कायम असल्याने हा बाजार सुरू आहे. नागपूर महापालिकेतर्फे सध्याचे भाजी मार्केट व बाजूच्या परिसरात अद्ययावत बाजार व अत्याधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स निर्मितीची योजना तयार केलेली आहे, अशी माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली. (प्रतिनिधी)