शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी न घेता बिल्डरने केली १८७ झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:06 IST

नागपूर : शहरातील एका बिल्डरने महापालिकेची परवानगी न घेता व्यावसायिक इमारतीच्या बांधकामासाठी १८७ झाडांची कत्तल केल्याची धक्कादायक माहिती समाेर ...

नागपूर : शहरातील एका बिल्डरने महापालिकेची परवानगी न घेता व्यावसायिक इमारतीच्या बांधकामासाठी १८७ झाडांची कत्तल केल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. याप्रकरणी महापालिकेने संबंधित बिल्डरला नाेटीस बजावली असून, वृक्षताेडीविराेधात न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.

उमरेडराेडवरील निर्मल उज्ज्वल क्रेडिट काे-ऑपरेटिव्ह साेसायटीद्वारे प्रायाेजित निर्मल नगरीच्या बिल्डरकडून ही वृक्षताेड झाली आहे. निर्मलनगरीला लागून असलेल्या भूमीवर माेठ्या प्रमाणात झाडांची संख्या हाेती. बाभूळ, सुबाभूळ, कडूनिंब, गुलमाेहर, बाेर आदी प्रजातींची दाट झाडे या परिसरात हाेती. विशेष म्हणजे यासाठी महापालिकेची परवानगी घेण्याची तसदीही बिल्डरने घेतली नाही. याबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाचे पथक त्या जागेची तपासणी करायला गेले असता १८७ झाडे कापलेली दिसून आली. पथकाने जागेवरील झाडांचा पंचनामा करीत कापलेल्या झाडांची नाेंदणी करून याविराेधात महाराष्ट्र वृक्षसंवर्धन व संरक्षण कायदा १९७५ नुसार संबंधित बिल्डरला नाेटीस बजावली आहे.

दरम्यान, निर्मल नगरीचे संचालक प्रमाेद मानमाेडे यांनी मनपाच्या आराेपांचे खंडन केले आहे. ही जागा निवासी गाळे इमारत बनविण्यासाठी घेतलेली असून, महापालिकेनेच आधीच हा ले-आउट मंजूर केला आहे. घेतलेल्या ले-आउटवरचीच झाडे कापली असून ही झाडे कुणीही लावली नाहीत. इमारत बांधकामासाठी ही जागा साफ करणे गरजेचे हाेते व तेच केले. बाभळीच्या झाडांना कापण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नव्हती आणि इतर झाडांना कापण्याच्या परवानगीसाठी आधीच महापालिकेकडे अर्ज दिला असून मंजुरी मिळण्यासाठी प्रतीक्षा करीत असल्याचे मानमाेडे यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना स्पष्ट केले.

मात्र विनापरवानगी झाडे ताेडणे बेकायदेशीर असून, बिल्डरकडून हा गुन्हा झालेला असल्याचे उद्यान विभागाने सांगितले. त्यामुळे झाडे ताेडण्याच्या या प्रकरणात बिल्डरविराेधात न्यायालयात जाणार असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, निर्मलनगरीसह आसपासच्या परिसरातील दरराेज सकाळ, सायंकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी झाडे ताेडण्यावर असंताेष व्यक्त केला आहे. या झाडांवर पाेपट, माेर, काेकीळ अशा विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास येथे हाेता. दाट झाडांच्या हिरवळीमुळे परिसरातील वातावरण आल्हाददायक हाेते. मात्र व्यावसायिक लाभासाठी कशाचाही विचार न करता येथील झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली. एनएचएआयद्वारे अजनी आयएमएस प्रकल्पासाठी प्रस्तावित वृक्षताेडीविराेधात आधीच पर्यावरणप्रेमींचे आंदाेलन चालले असताना या बिल्डरकडून झालेल्या या वृक्षताेडीमुळे पर्यावरणवाद्यांमध्ये असंताेष पसरला आहे.

बिल्डरकडून कापण्यात आलेली झाडे

झाडाचे नाव संख्या झाडांची उंची

बाभूळ ३५ ३० ते ३५ फूट

सुबाभूळ ७३ २५ ते ३० फूट

बाेर ७८ २२ ते २८ फूट

गुलमाेहर ०१ ३५ ते ४० फूट

एकूण १८७