शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्प पुन्हा लांबणीवर! मनपाचा आता १५ ऑगस्टचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 23:20 IST

महापालिकेचा २०२०- २१ या वर्षाचा अर्थसंकल्प ३१ जुलैपूर्वी सादर करण्याचा मानस स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी व्यक्त केला होता. परंतु मनपाच्या विविध विभागाकडून नियोजन प्राप्त न झाल्याने अर्थसंकल्प लांबणीवर पडला आहे.

ठळक मुद्देविभागाकडून नियोजन प्राप्त नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचा २०२०- २१ या वर्षाचा अर्थसंकल्प ३१ जुलैपूर्वी सादर करण्याचा मानस स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी व्यक्त केला होता. परंतु मनपाच्या विविध विभागाकडून नियोजन प्राप्त न झाल्याने अर्थसंकल्प लांबणीवर पडला आहे.झोन कार्यालय व संबंधित विभागांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही नियोजन प्राप्त झाले नाही. प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने जुलै महिन्यात अर्थसंकल्प सादर करता आला नाही. मात्र १५ आॅगस्टपर्यंत पुढील वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल, अशी माहिती पिंटू झलके यांनी दिली.जूनमध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरास्थायी समिती अध्यक्षाकडून साधारणपणे जून महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा आहे. शहरातील विकास कामांना गती मिळावी. या हेतूने एप्रिल महिन्यातच अर्थसंकल्प सादर करण्याचा पिंटू झलके यांचा मानस होता. परंतु प्रशासनाचे सहकार्य न मिळाल्याने जुलै महिन्यातही अर्थसंकल्प सादर करता आला नाही.कोरोनाचाही फटकाकोविड -१९ मुळे लॉकडाऊन कालावधीत कार्यालयीन कामकाज जवळपास ठप्पच होते. मनपाची यंत्रणा कोरोना नियंत्रणा व्यस्त झाली. यामुळे नियोजन कोलमडले. त्यात वित्त विभाग व झोन कार्यालयाकडून खर्चाचे विवरण वेळेवर प्राप्त झाले नाही. अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर विभाग प्रमुख कामाला लागले.शासन अनुदानही घटलेगेल्या वर्षी तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी ३१९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. आयुक्तांनी या अर्थसंकल्पाला कात्री लावत सुधारित अर्थसंकल्प २६९८ कोटीवर आणला. तर २०२०-२१ या वर्षाचा २५४७ कोटींचा प्रस्तावित अर्थसकल्प स्थायी समितीकडे सादर केला. राज्य सरकारने जीएसटी अनुदानात दर महिन्याला केलेली ४० कोटींची कपात व विशेष अनुदान प्राप्त होण्याची शक्यता नसल्याने स्थायी समिती अध्यक्ष आयुक्तांच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात किती वाढ करतात, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प