शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या मुद्यासह बसपा मैदानात

By admin | Updated: September 8, 2014 02:23 IST

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बसपा स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्या अंतर्गत बसपाने रविवारी...

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बसपा स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्या अंतर्गत बसपाने रविवारी दीक्षाभूमी ते संविधान चौक दरम्यान संघर्ष ज्योत रॅली काढून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. बसपा सुरुवातीपासूनच स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन करीत आली आहे. समर्थन इतरही राजकीय पक्षांनी केले आहे, मात्र बसपाची भूमिका सुरुवातीपासून कायम आहे, हे विशेष. यंदाची निवडणूक बसपा विदर्भाच्या मुद्यावरच लढणार आहे. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या कार्यक्रमांवरून याचे अंदाज बांधले जात होते. रविवारी बसपाने विदर्भ संघर्ष ज्योत पदयात्रा काढून ते जाहीर केले. रविवारी सकाळी ही पदयात्रा निघणार होती. परंतु पावसामुळे दुपारी २ वाजता पदयात्रेला सुरुवात झाली. तत्पूर्वी दीक्षाभूमी स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करून संघर्ष ज्योत प्रज्वलित करण्यात आली. पदयात्रा दीक्षाभूमी, काचीपुरा चौक, रामदासपेठ, लोकमत चौक, पंचशील चौक, झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, गोवारी शहीद स्मारक मार्गे संविधान चौकात पोहोचली. येथे जाहीर सभा घेण्यात आली. या संघर्ष ज्योत यात्रेत घोड्यांवर स्वार असलेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अ‍ॅड. सुरेश माने यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, विदर्भाच्या मुद्यावर आजवर विविध पक्षांनी लोकांना मूर्ख बनविले आहे. लोकांना खरच विदर्भ हवा असेल तर बसपाला निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.संघर्ष ज्योत यात्रेत कृष्णा बेले, हरीश बेलेकर, किशोर गजभिये, उत्तम शेवडे. अहमद कादर, भाऊ गोंडाणे, उषा बौद्ध, छाया कुरडकर, विश्वास राऊत, सागर डबरासे,, विवेक हाडके, पक्षाचे सर्व नगरसेवक आदींसह विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)