शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

दलाल, गुन्हेगारांवर कडक कारवाई करा

By admin | Updated: November 23, 2015 02:34 IST

गुन्हेगारांचे शहर, अशी नागपूरची प्रतिमा बनू नये. त्यासाठी दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करा ...

मुख्यमंत्र्यांनी खडसावले : नागपूरची प्रतिमा गुन्हेगारांचे शहर अशी बनू नये नागपूर : गुन्हेगारांचे शहर, अशी नागपूरची प्रतिमा बनू नये. त्यासाठी दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करा आणि पोलीस ठाण्याच्या परिसरात घुटमळणाऱ्या दलालांना हुसकावून लावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी शहर पोलीस दलाला दिले.उपराजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी पोलीस जिमखान्यात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलीस आयुक्त शारदाप्रसाद यादव आणि अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे यांच्यासह शहर दलातील बहुतांश वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.उपराजधानीत घडणारे खून, खुनाचे प्रयत्न, बलात्कार, दरोडे, अपहरण, जमिनी बळाकावणे, फसवणूक करणे आणि वेगवेगळ्या पद्धतीने होणारी खंडणी वसुली आदी गंभीर गुन्ह्यांमुळे वेगवेगळ्या अफवा पसरून नागपूरची प्रतिमा ‘गुन्हेगारांचे शहर‘ अशी होत चालली आहे. एकीकडे पोलीस आयुक्त नागपुरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना पुढे करीत आहेत. मात्र, काही अधिकारी या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याऐवजी दलालांच्या दडपणात काम करीत असल्यामुळे गुन्हेगार सोकावले आहेत. गुन्हेगारी, क्रिकेट बेटिंग, अवैध धंद्यात गुंतलेले चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांवर ते आरोप लावून दडपण आणण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळे चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांची कोंडी होत असून, गुन्हेगार, दलाल निर्ढावले आहेत. हा एकूणच प्रकार लक्षात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेतली. या पार्श्वभूमीवर शनिवारी पोलीस जिमखान्यात आयोजित बैठकीत त्यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी खंबीरपणे काम करण्याची गरज विशद केली. शहरात दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करा, असे आदेश देतानाच पोलीस ठाण्याच्या स्तरावर सक्रिय असलेल्या दलालांची लुडबूड बंद करा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.गुन्हेगारांवर कडक कारवाई करतानाच शहरातील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांना पोलिसांबद्दल आदर वाटेल,अशी भूमिका घेण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी विशद केली. गुन्हेगारी कमी झाल्याचे आकडे महत्वाचे नाही. तर, जनभावना महत्वाची आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. जनतेत विश्वास निर्माण करण्यासाठी घटनास्थळी तातडीने पोहचण्याचे तसेच रात्रीची गस्त वाढविण्याचेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. (प्रतिनिधी)आत्मविश्वास दुणावलाप्रारंभी मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. बोलण्याची संधी मिळाल्यामुळे पोलीस निरीक्षकांनी समस्यांचा पाढा वाचला. काम करताना येणाऱ्या अडचणीही सांगितल्या. त्या ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ‘स्मित हास्य करीत‘ पोलिसांच्या अडचणी दूर करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, थेट मुख्यमंत्र्यांनीच दलालांना दूर करण्याचे खणखणीतपणे आदेश दिल्याने पोलीस अधिकाऱ्यांचा विश्वास दुणावला आहे. राज्याचे प्रमुखच खंबीर भूमिका घेण्याचे सुचवित असल्याने दडपणात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनाही बळ मिळाले आहे.