Breaking news; Nitin Gadkari infected with Korana; In home separation | ब्रेकिंग न्यूज; नितीन गडकरी यांना कोरानाची लागण; गृह विलगीकरणात

ब्रेकिंग न्यूज; नितीन गडकरी यांना कोरानाची लागण; गृह विलगीकरणातलोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली असून ते गृह विलगीकरणात असल्याचे त्यांनी काही वेळापूर्वीच सोशल मिडियावरून कळवले आहे.
काल आपल्याला अशक्त वाटल्याने आपण डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली असता, कोविड १९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण आता गृह विलगीकरणात असून, जे आपल्या संपर्कात आले होते त्या सर्वांनी काळजी घ्यावी असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

Web Title: Breaking news; Nitin Gadkari infected with Korana; In home separation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.