शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

सुपारी देऊन पतीचा खून पत्नीसह दोघांना जामीन

By admin | Updated: November 21, 2015 03:31 IST

प्रियकराच्या मदतीने भाडोत्री गुंडांना दोन लाखांची सुपारी देऊन पतीचा खून केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्या. अरुण चौधरी यांच्या एकलपीठाने आरोपी महिलेसह दोघांना जामीन मंजूर केला.

नागपूर : प्रियकराच्या मदतीने भाडोत्री गुंडांना दोन लाखांची सुपारी देऊन पतीचा खून केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्या. अरुण चौधरी यांच्या एकलपीठाने आरोपी महिलेसह दोघांना जामीन मंजूर केला. मनीष किशोर मेश्राम (१९) रा. इंदोरा आणि वंदना रमेश देशभ्रतार (४६) रा. पागलखाना चौक, अशी आरोपींची नावे आहेत. रमेश रावजी देशभ्रतार (५७), असे मृताचे नाव होते. ते एनएडीटी येथे चपराशी होते आणि जरीपटका भागातील बाबा दीपसिंगनगर येथे राहत होते. खुनाची ही घटना १७ जानेवारी २०१५ रोजी बाबा दीपसिंगनगर येथे घडली होती. वंदना देशभ्रतार हिने लुटमारीतून आपल्या पतीचा खून करण्यात आल्याची तक्रार नोंदवल्यावरून जरीपटका पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या ३०२, ३९२ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पुढे तपासात वंदना देशभ्रतार हीच या खुनाची सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले होते. वंदना आणि मनीष मेश्राम यांचे अनैतिक संबंध होते. बाबा दीपसिंगनगर येथील घर, कोंढाळी येथील भूखंड आणि ग्रॅच्युएटीच्या रकमेवरून पती-पत्नीमध्ये भांडणे सुरू होती. वंदना ही आपल्या पतीला ही मालमत्ता मागत होती आणि तो नकार देत होता. त्यामुळे वंदना हिने आपला प्रियकर मनीष याच्या मदतीने भाडोत्री गुंडांना २ लाखांची सुपारी देऊन आपल्या पतीचा खून केला, असा आरोप आहे. तीन आरोपींनी रमेश देशभ्रतार यांचे हातपाय जखडून ठेवून मनीष मेश्राम याने स्कार्फने गळा आवळून खून केल्याचे तपासात आढळले होते. या दोन्ही आरोपींनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. न्यायालयात आरोपींच्यावतीने अ‍ॅड. लुबेश मेश्राम यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)