शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
3
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
4
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
5
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
6
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
7
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
8
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
9
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
10
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
11
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
12
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
13
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
14
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
15
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
16
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
17
'पॉलिटिकल स्टार्टअप'चे दिवस! कमल हासन-चिरंजीवी ठरले 'बर्न आउट', तर 'थलपती' विजय बनला लेटेस्ट 'राजकीय युनिकॉर्न'
18
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
19
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
20
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
Daily Top 2Weekly Top 5

जळालेला मृतदेह आढळला

By admin | Updated: May 25, 2014 00:47 IST

अंजनगाव सुर्जी मार्गावरील साखरी ते कसबेगव्हाण रस्त्यावर एका युवकाचा कोळसा झालेला मृतदेह आढळून आला. शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही बाब उघडकीस आली

कसबेगव्हाणनजीकची घटना : हत्या करुन पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल

खल्लार (अमरावती) : अंजनगाव सुर्जी मार्गावरील साखरी ते कसबेगव्हाण रस्त्यावर एका युवकाचा कोळसा झालेला मृतदेह आढळून आला. शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही बाब उघडकीस आली.

मृतदेहाच्या अवती-भोवती पसरलेल्या राखेमुळे खून करुन मृतदेह पेटवून दिल्याची चर्चा परिसरात होती. सायंकाळी खल्लार पोलिसांनी हत्या करणे आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा नोंदविला.

मृताचे वय २0 ते २५ वयोगटातील असल्याचा अंदाज आहे. साखरी व कसबेगव्हाण गावातील मजुरांना शनिवारी सकाळी हा मृतदेह ज्ञानेश्‍वर काळे यांच्या शेतालगतच्या रस्त्याच्या कडेला आढळून आला. त्यांनी घटनेची माहिती गावातील पोलीस पाटलांना दिली. पोलीस पाटलाने ही माहिती खल्लार पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला.

मृतदेहाच्या शेजारी दारुची बाटली व दाळवा आढळून आला. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.

या युवकाची आधी हत्या करण्यात आली व नंतर चारचाकी वाहनाने मृतदेह साखरी गावानजीक आणून तुराट्याच्या गंजीवर ठेऊन पेटवून दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांनी भेट दिली. घटनास्थळी श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले; परंतु श्‍वान पथक घटनास्थळाच्या अवती-भोवतीच फिरले. ते तपासाची दिशा देऊ शकले नाही.

तीन वर्षांपूर्वी साखरी गावालगतच अशीच घटना घडली होती. साखरी येथील सुयश डवले याची हत्या करुन याच मार्गावर त्याचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. आज शनिवारी पुन्हा याच मार्गावर युवकाची हत्या करुन त्याला पेटवून दिल्याचे उघड झाले आहे.(वार्ताहर)