शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची हॅट्ट्रिक की काँग्रेसची वापसी?

By admin | Updated: January 12, 2017 01:31 IST

महापालिका निवडणुकीचा बिगुल बुधवारी वाजताच सारेच पक्ष विजयासाठी सज्ज झाले.

बसपा करणार का यावेळी मॅजिक ? नागपूर : महापालिका निवडणुकीचा बिगुल बुधवारी वाजताच सारेच पक्ष विजयासाठी सज्ज झाले. भाजपा विकास कामांचा हवाला देऊन तर काँग्रेस भाजपच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचून मतदारांपुढे जाणार आहे. सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहेत. २१ फेब्रुवारी रोजी मतदान होऊन २३ फेब्रुवारीला मतमोजणीनंतर नागपूरकरांनी कुणाला कौल दिला हे कळेल. भाजपला ‘हॅट्ट्रिक ’ साधण्यात यश मिळते की महापालिकेत काँग्रेसची वापसी होते, हे देखील स्पष्ट होईल. एवढेच नव्हे तर दोन वर्षांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचाही अंदाज या निकालातून येणार आहे. महापालिकेत गेल्या १० वर्षांपासून असलेली सत्ता टिकविण्याचे भाजपसमोर आव्हान आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील ही निवडणूक असल्यामुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्याचेच नव्हे तर देशाचे या निवडणुकीकडे लक्ष आहे. भाजपला शंभराहून अधिक जागा जिंकत ‘हॅट्ट्रिक ’ करून देशात संदेश द्यायचा आहे. दुसरीकडे गेल्या दहा वर्षांचा वनवास संपविण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू आहे. विविध पक्षातील सात नगरसेवक पक्षात आल्याने काँग्रेसची हिंमत वाढली आहे. बसपादेखील ताकदीने रिंगणात उतरणार आहे. १२ नगरसेवकांहून ५० वर झेप घेण्याचा त्यांचा इरादा आहे. शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची स्थिती सारखी आहे. आघाडी व युती बाबत चित्र स्पष्ट नसल्यामुळे सध्यातरी त्यांना स्वबळावरच पुढे सरकावे लागत आहे. मनसेलाही गळती लागली आहे. चार सदस्यीय प्रभागात या पक्षांसमोर आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. महापालिकेच्या माध्यमातून गत दहा वर्षात शहरात केलेली विकास कामे, गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शहराचा होत असलेला विकास, या मुद्यावर आम्ही मतदारांपुढे जात आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठिशी पुन्हा एकदा शहरातील जनता ठामपणे उभी राहील, असा विश्वास आहे. - प्रवीण दटके, महापौर