शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आमदारांची कसोटी

By admin | Updated: February 16, 2017 02:14 IST

निवडणूक महापालिकेची असली तरी उमेदवारांसोबतच भाजपच्या आमदारांचीही कसोटी लागणार आहे.

कमी जागा आल्यास संकट फडणवीस, गडकरींचे संकेत ‘मिशन १२५’ चे आवाहन नागपूर : निवडणूक महापालिकेची असली तरी उमेदवारांसोबतच भाजपच्या आमदारांचीही कसोटी लागणार आहे. मर्जीतील उमेदवारांना तिकीट देण्यासाठी नेत्यांकडे आग्रह धरणाऱ्या आमदारांची आता आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी कसोटी लागणार आहे. अपेक्षेपेक्षा कमी जागा आल्या व त्यामुळे भाजपला ‘मिशन १२५’ गाठता आले नाही तर संबंधित आमदारांचे विधानसभेचे तिकीट संकटात येण्याचे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने तब्बल २४ नगरसेवकांचे तिकीट कापले. याशिवाय बऱ्याच दिग्गज पदाधिकाऱ्यांना तिकीट नाकारण्यात आले. भाजपच्या तिकीट वाटपात आमदारांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती, अशी माहिती समोर आली आहे. काही आमदारांनी पक्षाने केलेल्या सर्वेक्षणाच्या विरोधात जाऊन आपल्या समर्थकाला उमेदवारी मिळवून दिली. संबंधिताला आपण निवडून आणूच, असा शब्द फडणवीस, गडकरींना दिला. काही ठिकाणी उमेदवारांना कार्यकर्त्यांमधून विरोध झाला. मात्र, आमदारांनी संबंधित उमेदवाराची बाजू घेऊन हाच सक्षम असल्याचे ठासून सांगितले. त्यामुळे नेत्यांनीही आमदारांच्या पसंतीला प्राधान्य दिले. गडकरी, फडणवीस यांच्या राज्यभर प्रचार सभा लागल्या आहेत. नागपुरात ते अल्प काळ असतील. त्यामुळे प्रचाराची सर्व धुरा आता आमदारांच्या खांद्यावर आली आहे. अशात आमदारांनी आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केले, एखाद्या उमेदवाराबद्दलच्या नाराजीतून दुर्लक्ष केले व त्याचा परिणाम निकालावर झाला तर संबंधित आमदाराच्या रिपोर्टकार्डवर लाल फुली मारली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नेत्यांनी आमदारांकडून किती जागा निवडून येतील याची आकडेवारी घेतली. आमदारांनी दिलेली आकडेवारी काहीशी फुगीर होती. त्यावर नेत्यांनी एवढ्या जागा येतील का, असा प्रतिप्रश्न केला असता आमदारांनी ठासून होकार भरला. त्यामुळे आता दिलेला आकडा गाठण्यासाठी आमदारांची कसोटी लागणार आहे.(प्रतिनिधी)