शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने केला विश्वासघात

By admin | Updated: November 21, 2014 00:50 IST

सत्तेवर येताच राज्यातून एलबीटी हद्दपार करू, अशी घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर मात्र या मुद्यावर अक्षरश: यू टर्न घेतला आहे. जीएसटी लागू होईपर्यंत

एलबीटीवर व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया : पर्यायी कराची वाटनागपूर : सत्तेवर येताच राज्यातून एलबीटी हद्दपार करू, अशी घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर मात्र या मुद्यावर अक्षरश: यू टर्न घेतला आहे. जीएसटी लागू होईपर्यंत एलबीटी हटविला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केल्याने एलबीटी सध्या तरी कायम राहील, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, यासंदर्भात व्यापाऱ्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही संघटनांनी सरकारवर विश्वास दर्शवीत पुढील काळात एलबीटी हटविला जाईलच, असे मत व्यक्त केले. काहींनी मात्र हा एकप्रकारचा भाजप सरकारने केलेला विश्वासघात असल्याची प्रतिक्रिया दिली. जीएसटीमध्ये स्थानिक करांचा उल्लेख नसल्याने एलबीटी किंवा त्याच्या पर्यायाचा जीएसटीमध्ये समावेश होणार नाही. (प्रतिनिधी) दूरगामी परिणामनिवडणुकीच्या जाहीरनाम्यात आणि भाजपाच्या नेत्यांनी व्यासपीठावरून घोषणा केल्यानुसार भाजपा सत्तेवर आल्याबरोबर एलबीटीला पर्याय किंवा रद्द करण्याची घोषणा अपेक्षित होती. पण जीएसटी लागू होईपर्यंत एलबीटी हटविला जाणार नाही आणि त्याच्या पर्यायांवर विचार करण्यात येत असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा दूरगामी परिणाम दिसून येईल. कर देण्यास व्यापाऱ्यांचा नकार नाही. हा कर कुठेतरी जोडून आकारावा, एवढीच मागणी आहे. तेजिंदरसिंग रेणू, सचिव, विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशन.पर्याय नकोचराज्य शासनाचे उत्पन्न पाहता एलबीटीला पर्यायाची गरजच नाही किंवा जीएसटी लागू होईपर्यंत वाट पाहण्याचीही गरज नाही. देशात महाराष्ट्र वगळता सर्वच राज्यांमध्ये एलबीटी नाही. एलबीटी नाही म्हणजे कर आकारण्याची अन्य यंत्रणा आहेच आणि मनपाचा कारभारही सुरळीत सुरू आहे. त्या यंत्रणेचा शासनाने अवलंब करावा. बजेटमध्ये तरतूद करावी. योग्य पर्याय निवडावा.रमेश मंत्री, संयोजक, एलबीटी संघर्ष समिती.सकारात्मक निर्णय हवा मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान हे एलबीटीला पर्याय सुचविणारे आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा विश्वासघात होणार नाही. पुढील चार दिवसात व्यापारी संघटनांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे. बैठकीत पर्याय उत्तम निघेल. व्हॅटवर अतिभार लावण्याची मागणी चेंबरने पूर्वीच्या सरकारकडे केली होती. पुढे व्यापाऱ्यांचा विश्वासघात न होता राज्यातून एलबीटी हद्दपार होईल, असा विश्वास आहे. मयूर पंचमतिया, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स.सरकारचे घूमजावआधीच्या सरकारमुळे राज्यावर कर्जाचा डोंगर आहे, असे वक्तव्य करण्याऐवजी सरकारने एलबीटीचा पर्याय शोधावा आणि व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा. जीएसटी लागू होर्इंपर्यंत वाट पाहण्याची मुख्यमंत्र्यांची भाषा म्हणजे सरकारचे घूमजाव आहे. विकासासाठी पैसा कुठून येईल, हे पाहावे. जाहीरनाम्यात नमूद केल्यानुसार एलबीटी तात्काळ रद्द करावा. घोषणा फोल ठरल्या आहेत. कैलास जोगानी, अध्यक्ष, नागपूर चेंबर आॅफ कॉमर्स.करासाठी पर्याय सुचविला, योग्य निर्णय निघेलगुरुवारी विविध आयुक्तांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी जीएसटी लागू होईस्तोवर एलबीटी सुरू राहील आणि लवकरच पर्याय निघेल, असे विधान केले आहे. व्यापाऱ्यांचा विश्वासघात होणार नाही, अशी अपेक्षा आहे. चार दिवसानंतर व्यापारी संघटनांशी बैठक होणार आहे. आम्ही वार्षिक १४,५०० कोटी रुपयांच्या करासाठी पर्याय सुचविला आहे. त्यावर निर्णय होईल, असा विश्वास आहे. दीपेन अग्रवाल, अध्यक्ष, एलबीटी संघर्ष समिती.