शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

‘बायो-टॉयलेट’मुळे वाढेल आता रेल्वे रुळांचे आयुष्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 11:02 IST

पारंपरिक शौचालयांमुळे उद्भवत असलेल्या समस्यांवर उपाय शोधून काढत मध्य रेल्वे झोनने पारंपरिक शौचालयांच्या ऐवजी बायो टॉयलेट लावण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार मागील १० वर्षात झोनमधील सर्वच कोचमध्ये बायो टॉयलेट बसविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपर्यावरणाची हानी टळणारमध्य रेल्वेचा पुढाकार

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेगाड्यातील पारंपरिक शौचालयामुळे मलमूत्र रेल्वे रुळावर पडल्यामुळे रेल्वे रुळांचे आयुष्य कमी होत होते. आजूबाजूच्या परिसरातील नैसर्गिक जलस्रोतही दूषित होत होते. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत होती. यावर उपाय शोधून मध्य रेल्वेने झोनमधील ५,०१५ कोचमध्ये १८,४५० बायो टॉयलेट बसविल्यामुळे पर्यावरण, जलस्त्रोत दूषित होणार नसून रेल्वे रुळांचे आयुष्य वाढण्यासही मदत होणार आहे.भारतीय रेल्वेत असलेल्या पारंपरिक शौचालयातील मलमूत्र थेट रेल्वे रुळावर पडत होते. यामुळे रेल्वे रुळांचे आयुष्य कमी होत होते. रेल्वे रुळावर मलमूत्र पडल्यामुळे या परिसरातील नैसर्गिक जलस्रोत दूषित होत होते. रेल्वे रुळांची देखभाल करणाऱ्या गँगमननाही यामुळे विविध आजार जडत होते. रेल्वेस्थानकावर गाडी थांबल्यामुळे या गाड्यांची देखभाल करणाºया अभियांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांना काम करणे कठीण होत होते. पारंपरिक शौचालयांमुळे उद्भवत असलेल्या समस्यांवर उपाय शोधून काढत मध्य रेल्वे झोनने पारंपरिक शौचालयांच्या ऐवजी बायो टॉयलेट लावण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार मागील १० वर्षात झोनमधील सर्वच कोचमध्ये बायो टॉयलेट बसविण्यात आले आहेत. एका कोचमध्ये ४ बायो टॉयलेट याप्रमाणे १८ हजार ४५० बायो टॉयलेट बसविले आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे