शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

कामठी कॅन्टोन्मेंट बोर्डातील पदभरतीत मोठा ‘गोलमाल’; रिकामी उत्तरपत्रिका, तरीदेखील ‘पेन’मुळे उमेदवार पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2023 08:00 IST

Nagpur News जानेवारी महिन्यात झालेल्या लेखी परीक्षेच्या अगोदरच रॅकेटची सुरुवात झाली होती. अनेक उमेदवारांनी त्यांच्या ‘ओएमआर शीट’वर (उत्तरपत्रिका) एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नव्हते. मात्र, तरीदेखील त्यांची नावे पात्र उमेदवारांच्या यादीत लागली.

योगेश पांडे

नागपूर : कामठी कॅन्टोन्मेंट बोर्डातील पदभरतीत पैसे घेऊन नियुक्तिपत्र देण्याच्या रॅकेटचा ‘सीबीआय’ने भांडाफोड केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या या बोर्डाच्या भरतीप्रक्रियेत सुरुवातीपासूनच सावळागोंधळ होता. जानेवारी महिन्यात झालेल्या लेखी परीक्षेच्या अगोदरच रॅकेटची सुरुवात झाली होती. अनेक उमेदवारांनी त्यांच्या ‘ओएमआर शीट’वर (उत्तरपत्रिका) एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नव्हते. मात्र, तरीदेखील त्यांची नावे पात्र उमेदवारांच्या यादीत लागली. या सर्वामागे त्यांनी वापरलेल्या ‘पेन’चीच ‘लिंक’ असून, त्याचाच उपयोग करत रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनीच उत्तरे ‘शीट’वर भरली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

‘सीबीआय’च्या छाप्यांमुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणाची ‘सीबीआय’ला विश्वासू खबऱ्यांकडून ‘टीप’ मिळाली. तसेच भरती प्रक्रियेत सुरुवातीपासूनच कसे काय रॅकेट सुरू आहे, याची इत्यंभूत माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी सफाई कर्मचारी, सहायक शिक्षक व माळी पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. नियोजित वेळापत्रकानुसार १ जानेवारी रोजी लेखी परीक्षा होणार होती. मात्र ती परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्यात आली व १४ जानेवारी रोजी परीक्षा झाली. परीक्षा होण्याअगोदरच सूत्रे हलण्यास सुरुवात झाली होती.

रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांनी अज्ञात अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांशी संपर्क केला व ‘डील’ निश्चित केली. लेखी परीक्षेच्या वेळी केवळ ‘ओएमआर शीट’वरील नाव, परीक्षा क्रमांक, पदाचे नाव इत्यादी जुजबी आवश्यक माहितीच भरण्याची सूचना त्यांना करण्यात आली. एकाही प्रश्नाच्या उत्तरासमोर खूण करायची नाही, असे बजावण्यात आले. त्यानुसार काही उमेदवारांनी उत्तरपत्रिका रिकाम्याच ठेवल्या. परीक्षा झाल्यावर त्यांच्याकडून त्यांनीच वापरलेले ‘पेन’ घेण्यात आले व संबंधितांच्या उत्तरपत्रिकेत रॅकेटमधील अज्ञात आरोपींकडून बरोबर उत्तरांसमोर खूण करण्यात आली. जर वेगळ्या पेनाने या खूणा झाल्या असत्या तर चौकशीचा फेरा लागण्याची शक्यता होती. त्यामुळेच ‘पेन’ची ही ‘लिंक’ आरोपींनी शोधून काढल्याची माहिती सुत्रांनी दिली.

हिशेब ठेवायला नेमावी लागली शिक्षिका

सीबीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रॅकेटमध्ये अनेक जण सहभागी असल्याची शक्यता आहे. आरोपी चंद्रशेखर लांजेवार या प्रकरणात मोठ्या भूमिकेत होता. तोदेखील या प्रकरणात एक मोहराच होता. लांजेवारला पैशांचा हिशेब ठेवण्यासाठी एक शिक्षिका नेमावी लागली. तिच्याकडेच कुणाला किती पैसे दिले, याचा हिशेब ठेवण्याची जबाबदारी होती. यातूनच या प्रकरणाची मुळे खोलवर रूजली असल्याचे दिसून येत आहे.

‘सिव्हीलिअन स्टाफ’वर चौकशीचा रोख

या प्रकरणात संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. सीबीआयने केलेल्या कारवाईचा रोख कॅन्टोन्मेंटमधील ‘सिव्हिलिअन स्टाफ’वर आहे. यात सैन्यदलातील किंवा सेवेतील कुठलाही अधिकारी वा कर्मचारी सहभागी नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

टॅग्स :examपरीक्षाfraudधोकेबाजी