भरधाव कार उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:12 IST2021-09-16T04:12:46+5:302021-09-16T04:12:46+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : अचानक समाेर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात अनियंत्रित भरधाव कार उलटली. त्यात कारमधील काही जण ...

Bhardhaw's car overturned | भरधाव कार उलटली

भरधाव कार उलटली

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : अचानक समाेर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात अनियंत्रित भरधाव कार उलटली. त्यात कारमधील काही जण किरकाेळ जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेरी शिवारातील पंचाळा वळणाजवळ बुधवारी (दि. १५) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.

तिराेडा येथील कुटुंबीय रामटेक येथून एमएच-४०/एआर-८८०३ क्रमांकाच्या कारने तिराेडा येथे जायला निघाले हाेते. दरम्यान, बाेरी शिवारातील पंचाळा वळणाजवळ अचानक दुचाकीस्वार समाेर आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्यालगत उलटली. यात कारमधील पाच जणांना किरकाेळ दुखापत झाली. नागरिकांनी जखमींना रामटेक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून, सर्वांची प्रकृती चांगली आहे. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी घटनेची नाेंद केली आहे. ठाणेदार प्रमाेद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक सीमा बाेंद्रे करीत आहेत.

Web Title: Bhardhaw's car overturned