शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

मनीषनगरातील सट्टा अड्ड्यावर धाड

By admin | Updated: May 18, 2016 03:20 IST

जरीपटक्यातील कुख्यात बुकी दिलीप नानकराम कुकरेजा आणि त्याच्या साथीदारांकडून चालविण्यात येणाऱ्या मनीषनगरातील सट्टा अड्ड्यावर...

चार बुकी जेरबंद : सोनेगाव पोलिसांची कारवाई नागपूर : जरीपटक्यातील कुख्यात बुकी दिलीप नानकराम कुकरेजा आणि त्याच्या साथीदारांकडून चालविण्यात येणाऱ्या मनीषनगरातील सट्टा अड्ड्यावर धाड घालून सोनेगाव पोलिसांनी बुकी कुकरेजा तसेच त्याच्या तीन साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून २ कलर टीव्ही, २ लॅपटॉप, ३६ मोबाईल फोन, १ प्रिन्टर,९ मोबाईल चार्जर तसेच खायवाडीचे रजिस्टर आणि ३ दुचाक्यांसह ३ लाख, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जरीपटका (कच्छा) येथील दिलीप कुकरेजा आणि त्याचे साथीदार गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट सट्टा अड्डा चालवतात. एकेका मॅचवर ते करोडोंची खायवाडी करतात. जरीपटका, पाचपावली, धरमपेठ, यशोधरानगर, वाडी, एमआयडीसी,प्रतापनगरसह अनेक परिसरात त्यांचे पॉश अड्डे आहे. न्यू मनीषनगरातील नेक्स्ट अल्टिमेट अपार्टमेंटमध्ये त्यांनी अड्डा सुरू केला होता. त्याची माहिती कळताच सोनेगावचे ठाणेदार अशोक बागुल यांच्या नेतृत्वातील पोलीस पथकाने तेथे धाड घालून बुकी कुकरेजा, रवी पवनदास गुरवाणी (वय ३२, रा. खामला), कमल ग्यानचंद आसवाणी (वय ३५, रा. हाऊसिंग बोर्ड कॉलनी, जरीपटका), जय किशोर मघराणी (वय २३, रा. खामला) हे सर्व आयपीएलच्या कोलकाता नाईटरायडर विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगळुरु दरम्यान सुरू असलेल्या सामन्यावर क्रिकेट सट्ट्याची खायवडी करताना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून उपरोक्त साहित्य जप्त केले.पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे, सहायक आयुक्त शेखर तोरे, ठाणेदार अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, हवालदार वसंता नारखेड, नायक ज्ञानेश्वर बांते, ललित तितरमारे, अनिल झाडे यांनी ही कारवाई केली.(प्रतिनिधी)