शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंप मालकांचा फायदा तर मनपाची हानी

By admin | Updated: July 30, 2015 03:14 IST

राज्य सरकारने जर ५० कोटीपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांवर एलबीटी कायम ठेवला तर बहुतांश पेट्रोल पंप मालकांना एलबीटीपासून मुक्ती मिळणार आहे

सोपान पांढरीपांडे  नागपूरराज्य सरकारने जर ५० कोटीपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांवर एलबीटी कायम ठेवला तर बहुतांश पेट्रोल पंप मालकांना एलबीटीपासून मुक्ती मिळणार आहे व त्यामुळे २५ महानगरपालिकांचा महसूल घटणार आहे.आज तारखेला पेट्रोलियम कंपन्या म्हणजे इंडियन आॅईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम, रिलायन्स पेट्रोकेमिकल्स इ. कंपन्या त्यांच्या डिलरकडून एलबीटी वसूल करतात व महानगरपालिकांमध्ये भरणा करतात. यासाठी पेट्रोलियम कंपन्या डिलरच्या बिलातच एलबीटी आकारतात.नागपूर शहरात विविध पेट्रोलियम कंपन्यांचे ११२ पेट्रोल पंप कार्यरत आहेत. परंतु यापैकी एकाही पेट्रोल पंपाची वार्षिक उलाढाल ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक नाही. त्यामुळे ५० कोटी उलाढालीचा निकष लागू झाला तर हे सर्व पेट्रोल पंप मालक आपल्या कंपन्यांकडे बिलात एलबीटी आकारू नका अशी विनंती करतील. याबाबतीत संपर्क इंडियन आॅईल कॉर्पोरेटरचे सिनीयर डिव्हिजनल मॅनेजर एम.के. पाठक म्हणाले, ‘‘आमचे ३० पेट्रोल पंप शहरात कार्यरत आहेत, पण त्यापैकी कुणाचीही उलाढाल ५० कोटी रुपये नाही. जर या डिलरनी एलबीटी आकारू नका अशी विनंती केली तर आम्हाला ती मान्य करावी लागेल’’ असेही पाठक म्हणाले.नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम म्हणाले, शहरात दरवर्षी १५०० कोटी रुपयांचे पेट्रोल विकले जाते व त्यावर ३.५ टक्के दराने नागपूर मनपाला ५२ ते ५४ कोटी रुपये एलबीटीचा महसूल मिळतो. हा महसूल बंद झाला तर मनपाची आर्थिक स्थिती बाधित होऊ शकते. दरम्यान मंगळवारी राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकार ५० कोटीचा निकष परत घेऊन १ आॅगस्टपासून एलबीटी संपूर्णत: रद्द करणार आहे अशी घोषणा केली आहे. परंतु एलबीटीच्या ८४०० कोटीच्या महसुलाची भरपाई सरकार कशी करणार आहे, ते अजूनही स्पष्ट नाही. यावरून जीएसटी लागू होईपर्यंत एलबीटी कायम राहणार आहे, हे स्पष्ट दिसते आहे. (मालिका समाप्त)