शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

'बे एक बे' स्पर्धा : सात हजार विद्यार्थ्यांनी स्पर्धेत वाचले पाढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:47 AM

मुलांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी. डिजिटल कॅलक्युलेटरच्या काळात मुलांना पाढे पाठ व्हावेत, या उद्देशाने अग्रेसर फाउंडेशनने घेतलेल्या आंतरशालेय 'बे एक बे' या गणित स्पर्धेला उत्स्फूर्ते प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देअग्रेसर फाऊंडेशनतर्फे आंतरशालेय स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी. डिजिटल कॅलक्युलेटरच्या काळात मुलांना पाढे पाठ व्हावेत, या उद्देशाने अग्रेसर फाउंडेशनने घेतलेल्या आंतरशालेय 'बे एक बे' या गणित स्पर्धेला उत्स्फूर्ते प्रतिसाद मिळाला. शहारातील ३५ शाळांमधून तब्बल ७ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.स्पर्धेत विजयी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी जय्यत तयारी केली होती. अग्रेसर फाऊंडेशनच्या ७० स्वयंसेवकांच्या योगदानातून स्पर्धा घेण्यात आली. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दोन ते विस पर्यंत, तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन ते तीस पर्यंतचे पाढे मुकपाठ असणे अपेक्षित होते. स्पर्धेत 'पंधरा साते किती', 'बारा आठे किती' असे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले. अग्रेसर फाऊंडेशनने 20 डिसेंबरला अंतिम फेरी घेतली. यात उत्तीर्ण स्पर्धकांना गौरविण्यात आहे. निहाल नानेटकर, ऋषिकेश जोशी, स्वप्नील तडस, श्रेयस जटलवार, जगदीश चिंतलवार, सचिन कश्यप, दीपक फुलबांधे, रक्षक ढोके, मोहित येंडे, अविनाश नारनवरे, वैष्णवी राऊत, अनुप सरोदे, अनिकेत ढबाले, महेश पाखमोडे, योगिता धोत्रे, दीपक तायवाडे, संकेत दुबे व मेघ गेडाम यांनी अग्रेसर फाउंडेशनच्या सदस्यांच्या मदतीने स्पर्धेची धुरा सांभाळली.उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरवस्पधेर्चा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी गणित दिनी आयोजित करण्यात आला. पहिल्या गटात सक्षम हातमोडे यास प्रथम, विनीत तोंडारेला द्वितीय व कृतिका हरडेला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. दुसऱ्या गटात वंश तितमारेने प्रथम क्रमांक पटकावला. गिरिश डाफला द्वितीय तर तुलसी देवांगणला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी केशवनगर शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद भाखरे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आशुतोष वक्रे, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक दीपक खिरवडकर, बिपीन गिरडे, धनवटे महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेंद्र जिचकार, राहुल राय उपस्थित होते. प्रास्ताविक प्रांजली वानखेडे यांनी केले. संचालन साक्षी राऊत, आयुष मुळे व कृतिका लाखे यांनी केले. आभार पियुष बोईनवाड यांनी मानले.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर